Breaking
ब्रेकिंग

कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न पुर्तीने संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संलग्न संजीवनी वरिष्ठ विज्ञान, वाणिज्य,कला महाविद्द्यालयास नॅकची ‘ए ग्रेड’– संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

0 0 2 9 2 9

कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न पुर्तीने संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संलग्न संजीवनी वरिष्ठ विज्ञान, वाणिज्य,कला महाविद्द्यालयास नॅकची ‘ए ग्रेड’– संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

कोपरगांव: युनिव्हर्सिटी ग्रॅन्टस् कमिशन (युजीसी) अधिपत्याखालील नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिकडटेशन कौन्सिलने (नॅक) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संलग्न संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्याुटस् संचलित संजीवनी कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय मुल्यांकन करून या महाविद्यालयास नॅकने विविध निकषांच्या आधारे ‘ए ग्रेड’ देवुन संजीवनीच्या दर्जा व गुणवत्तेवर मोहर उमटवली. यापुर्वी महाविद्यालयास बी ग्रेड होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संजीवनी वरिष्ठ महाविद्यालय विनाअनुदानित वर्गवारीत ए ग्रेड प्राप्त करून निवडक महाविद्यालयांमध्ये स्थान प्राप्त केले असे गौरवोद्गार संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे,कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी
महाविद्यालाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक घेवुन संजीवनीच्या वैभवात भर घालणाऱ्या नॅक कडून ‘ए ग्रेड’ मिळाल्याब़द्दल बोलताना गौरवोद्गार सर्व सहकाऱ्यांचेअभिनंदन केले.

यावेळी विविध निकष प्रमुखांनी नॅकच्या मुल्यांकना दरम्यान अनुभव कथन करून नॅकने अनेक चांगल्या उक्रमांचे कौतुक केलं करून अनुदानित महाविद्यालयांकडे सुध्दा येथिल महाविद्यालया इतकी साधन सामुग्री व उच्च शैक्षणिक अर्हतेचे प्राद्यापक नसतात, असे नमुद केल्याचे सांगीतले. तसेच संजीवनी कॉलेज ग्रामिण भागात असुनही येथिल प्राद्यापकांनी संशोधन कार्यात आघाडी घेत तब्बल २० पेटेंटस् रजिस्टर केल्याबध्दल नॅकने विशेष कौतुक केल्याचेही सांगीतलेे.


नॅकच्या मुल्यांकनात शिक्षकांनी प्रसिध्द केलेले संशोधनात्मक शोध निबंध, अध्यापन-अध्ययन पध्दती व त्यात एआयचा वापर, विद्यार्थ्यांसाठीच्या विविध सुविधा, प्रयोगशाळा व त्यातील आधुनिक साधन सामुग्री, व्यवस्थापनाची साथ, सर्वोत्तम पध्दतींचा अवलंब, महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या नोकऱ्या , विविध परीक्षांचे उत्कृष्ट निकाल, खेळ सुविधा व विद्यार्थ्यांनी विविध पातळींवर खेळात मिळविलेले प्राविण्य, संशोधनात्मक कार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि दर्जा, महाविद्यालयास व मिळालेले विविध पुरस्कार, माजी विद्यार्थ्यांचा कक्ष आणि संस्था व माजी विद्यार्थी यांचेतील परस्परातील वैचारीक अथवा अन्य बाबींची देवाण घेवाण, विविध परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार, इत्यादी बाबींची सत्यता पुराव्यांसह पडताळण्यात आली.


नॅकच्या मुल्यांकनासाठी विविध निकष प्रमुखांनी जोरदार तयारी केली होती. यात प्राचार्य डॉ. समाधान दहिकर यांच्यासह अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्युएसी) डॉ. सरीता भुतडा, नॅक समन्वयक प्रा. योगेश शिंदे , विभाग प्रमुख योगेश गाढवे, प्रा मनीषा निकम, डॉ. मुक्ता शिंदे , प्रा. पंकज भड, प्रा. माणसी मेंदु व रजिस्ट्रार रविंद्र बनकर या टीमने आपापल्या निकषांसंदर्भात भक्कम बाजु मांडल्या आणि नॅक कडून ‘ए ग्रेड’ ला गवसणी घातली.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 9 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे