Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

सदगुरू गंगागीर महाराज विज्ञान संजीवनी, गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात प्रथम वर्ष ( कला) प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 4 7

सदगुरू गंगागीर महाराज विज्ञान संजीवनी, गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स महाविद्यालयात प्रथम वर्ष ( कला) प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न…

 🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे शै.वर्ष २०२४-२५मध्ये प्रथम वर्ष कला या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभात सर्व कला विभागातील सर्व सहकारी प्राध्यापकांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. सदर समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या डॉ उज्ज्वला भोर यांनी भूषविले.

अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, “या महाविद्यालयात शिक्षक आपल्या दारी, कमवा व शिका योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ,सांस्कृतिक उपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, इत्यादी अनेक उपक्रम चालविले जातात तसेच शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा,पालक मेळावा याचे आयोजन केले जाते. महाविद्यालयाच्या गुणात्मक वाढीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. हे महाविद्यालय डिजिटल क्लासरूम एल.सी.डी.प्रोजेक्टरसारख्या सुविधांनी अद्ययावत आहे. येथे मोठे क्रीडांगण, ऑडिटोरियम हॉल, पौष्टिक आणि चविष्ट आहार मिळावा या दृष्टीने उत्तम कँटीन आहे. सुरक्षित असे मुलींचे व मुलांचे वसतिगृह आहे .कला विभागातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस ट्रेनिंग सुरू केले आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. यशवंत माधव प्रा. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली सुपेकर, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रंजना वर्दे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बंडेराव तऱ्हाळ, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. देविदास रणधीर,इतिहास विभाग प्रमुख प्रा. किरण पवार,सर्व समिती चेअरमन, सहकारी प्राध्यापक तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगिता भिलोरे व प्रा. अश्विनी पाटोळे यांनी केले.तर आभार प्रा. डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे