Breaking
ब्रेकिंग

मानव कायम स्वरुपी विद्यार्थी असल्याने शिकण्यात सातत्य ठेवा – जागतिक माहिती तज्ञ श्री आकाश खुराना

0 0 1 9 4 7

मानव कायम स्वरुपी विद्यार्थी असल्याने शिकण्यात सातत्य ठेवा —- जागतिक माहिती तज्ञ श्री आकाश खुराना

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ‘संजीवनी थॉट लिडर’ कार्यक्रम संपन्न

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क

कोपरगांव: जीवनात पुढे जात असताना समस्या, अडचणी येतील, समस्यांपासुन दुर न जाता त्यांना जवळ करून त्यांचे निराकरण करा. यासाठी मानव कायमस्वरूपी विद्यार्थी असल्याने नवनवीन शिकत रहा. शिकण्यात सातत्य ठेवल्यास यशस्वी जीवन जगणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन युएसए मधिल वेस्को कंपनीचे चिफ एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेट, चिफ इन्फर्मेेशन व चिफ डीजिटल आफिसर आणि संजीवनी इंजिजिअरींग कॉलेजचे १९९५ बॅचचे माजी विध्यार्थी श्री आकाश खुराना यांनी केले.


संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये उद्योग जगताची माहिती होण्यासाठी माय स्टोरी बोर्ड, संजीवनी आय कनेक्ट व संजीवनी थॉट लिडर असे प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मेकॅनिकल इंजिनिअरींग व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आयोजीत केलेल्या संजीवनी थॉट लिडर या कार्यक्रमात श्री खुराना यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर श्री खुराना यांचे आई वडील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद पटारे, डीन-ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग डॉ. विशाल तिडके व हेड-कार्पोरेट रिलेशन्स श्री इम्राण शेख उपस्थित होते. विध्यार्थ्यांची संख्या उल्लेखनिय होती.


प्रारंभी डॉ. ठाकुर यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट केला. तसेच संस्था पातळीवर आपण का शिस्तप्रिय असतो, हे सांगताना ते म्हणाले याचे उत्तर श्री खुराना यांच्या माध्यमातुन विध्यार्थ्यां समोर आहे.


श्री अमित कोल्हे म्हणाले की श्री खुराना हे जगातील पहिल्या शंभरातील चिफ इन्फर्मेशन आफिसर असुन ही बाब संजीवनीच्या दृष्टीने भुषणावह आहे. ते जेव्हा भारतात येतात तेव्हा ते संस्थेस अवश्य भेट देतात, ही बाब परस्परातील आपुलकीचे प्रतिबिंब आहे. कोणतीही शैक्षणिक संस्था ही चार स्तंभांवर आधारीत असते, त्यापैकी संस्थेचे माजी विध्यार्थी हा महत्वपुर्ण स्तंभ आहे.

संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी ज्या हेतुने संस्था सुरू केली, तो हेतु सफल होत असुन संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे कार्य अधिक नेटाने सुरू आहे.


श्री खुराना म्हणाले की येथे आल्यावर घरी आल्यासारखे वाटते. आपला २७ वर्षांचा जीवन प्रवास उलगडताना त्यांनी सांगीतले की सुरूवातीचे तीन वर्षे स्थीर स्थावर होण्यात गेले. परंतु युएसए मधिल जनरल इलेक्ट्रिकल्स उत्पादीत एक्स रे व एमआरआय मशीनचे सॉफ्टवेअर्स विकसीत करण्यात यश आले, तेच सॉफ्टवेअर्स अद्यापही कार्यरत आहेत. तेव्हापासुन आत्मविश्वास बळावला. मॅकडरमॉट मध्येही सहा वर्षे नोकरी करून तेथेही सॉफ्टवेअर्स विकसीत करण्यात यश आले, आणि आत्मविश्वास अधिकच बळावला. त्यांच्या भाषणा दरम्यान त्यांनी विध्यार्थ्यांना जीवनाची पाच तत्वे सांगीतली.

प्रथम त्यांनी सांगीतले की सतत नवनवीन शिकण्यासाठी लक्ष केंद्रीत करा. दुसरे बदल स्वीकारा नाहीतर बदल तुम्हाला बदलायला भाग पाडतील. तिसरे काहीतरी नाविण्यपुर्ण नेतृत्व अंगीकारा जेणे करून कंपनी, ग्राहक, कंपनीचे कर्मचारी, भाग भांडवलदार यांना फायदा होईल. चौथे कितीही यश आले तरी डोके वरती ठेवुन पाय जमिनीवरच असु द्या आणि पाचवे तत्व त्यांनी सांगीतले की मित्र, सल्लागार, मार्गदर्शक, इतर लोक यांचे मजबुत नेटवर्क तयार करा, हे जाळे कधिही उपयोगी पडू शकते.
यावेळी माजी विध्यार्थ्याचे उत्तरदायित्व या नात्याने त्यांनी वेस्को मध्ये २५ विध्यार्थ्यांना इंटर्नशिप व २५ विध्यार्थ्यांना नोकरी देण्याचे आश्वासित केले. विध्यार्थी आदित्य मोरे व धनश्री चौधरी यांनी सुत्रसंचालन केले तर डॉ. तिडके यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे