आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राज्यातील ग्रामीण भागात प्रथमच सलग सहा महिन्यांत पन्नास हजारांवरील रूग्णांची मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया करणार – अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी
संपादक - अरुण आहेर

आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राज्यातील ग्रामीण भागात प्रथमच सलग सहा महिन्यांत पन्नास हजारांवरील रूग्णांची मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया करणार – अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी
🔥 आग न्यूज पोर्टल
अहिल्यानगर ( अहमदनगर) : जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी पासून ५ कि.मी, अंतरावर असलेल्या प्रभु रामचंद्र, संतश्री साईबाबा पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्मभूमीत, ॐ गुरुदेव जंगली महाराज आश्रम, आंतरराष्ट्रीय आत्मा मालिक ध्यान विद्यापीठ, राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी कर्मभूमी व समाधी समाधी स्थळ अशा पावनभुमीत पाच राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्ग संलग्न, आंतरराष्ट्रीय श्री साईबाबा विमानतळ, दुहेरी रेल्वे मार्ग ,संभाव्य तीन औद्योगिक वसाहत निर्मिती, आंतरराष्ट्रीय क्रिडा स्टेडियम सुविधा असलेल्या श्रीक्षेत्र कोकमठाण गांवात ॐ जंगली गुरुदेव महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १ डिसेंबर २०२४ पासून सलगपणे सहा महिने किमान ५० हजारापेक्षा जास्त विविध प्राणघातक, सामान्य रुग्णांवर मोफत तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती ॐ गुरुदेव जंगली महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी हॉस्पिटल सी .ई. ओ. डॉ. नितीन पाटील व महाव्यवस्थापक सुनिल पोकळे यांच्या समवेत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
यावेळी बोलतांना अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी पुढे म्हणाले, आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये १०० खाटा, रुग्णालय व्यवस्थापन नियमावली नुसार ४ अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा विकसित शस्त्रक्रिया रुम,कॅथलॅब, डायलिसिस अत्याधुनिक यंत्रणा, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयावरील विकाराच्या समस्या संबधी अवघड आणि प्राणघातक आजारांवरील यशस्वी उपचार आणि शस्त्रक्रिया करिता राज्यातील खासगी ५० हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा देणारे व मराठवाडा,विदर्भासह श्री साईबाबा व ॐगुरुदेव जंगली महाराज आश्रम, राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थान आदी देवदेवतांच्या दर्शनासाठी रोज येणारे लाखो भक्तगण परिवारांच्या शिवाय हा परिसर देशाला सर्व दिशांनी मध्यवर्ती असून विमान, रेल्वे, रस्ते , पाच राष्ट्रीय महामार्गासह समृद्धी मार्ग रस्त्यावरुन होणारे दररोज किमान लाखावर भक्तांचा व नागरीकांचा अहोरात्र वावर आहे.
तसेच सभोवतालच्या पाच. महानगरे, औद्योगिक वसाहती, आंतरराष्ट्रीय, दे श व राज्य पातळीवरील ऐतिहासिक, पौराणिक, प्राचीन तिर्थक्षेत्रांनी हा परिसर सतत गजबजला असल्याने राज्य -वेशातील हजारो रूग्णांना हे हॉस्पिटल अत्यंत सोयीस्कर व तत्काळ जीवदान देणारे ठरले आहे.
दरदिवशी हजारांवर रुग्ण या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर यशस्वीपणे अत्यंत कमीतकमी खर्चात उपचार करून घेत आहे.
या हॉस्पिटलमध्ये १८ आय.सी.यू. व, १८ एन.आय. सी.यू. बेड बरोबर एक्स-रे ,सि.टी.स्कॅन, स़ोनोग्राफी आदी प्रगत, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित सूविधा,पुरविली जाते.देश व राज्य पातळीवरील विविध आजार यशस्वीपणे कार्यरत असलेले प्रख्यात डॉक्टर येथे नियमितपणे रुग्णांची सेवा करतात
या हॉस्पिटलमध्ये बी.पी.शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्सरे २डी.इको, ॲंजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक उपचार, नेत्र तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया, लॅबच्या सर्व चाचण्या सी.बी.सी. ,बी.एस.एल सह तपासण्या केल्या जातात.
ह्या हॉस्पिटलमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पंतप्रधान जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, विविध आरोग्य विमा योजना, हॉस्पिटल सवलत योजना आदी स्वरूपात सवलत लाभ रुग्णांना मिळतो. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होतांना कोणत्याही रोख स्वरूपात डिपॉझीट भरावे लागत नाही.
स्थापनेपासून आजपर्यंत या हॉस्पिटलमध्ये किमान पाच लाख पेक्षा जास्त रुग्णांनी विविध आरोग्य शिबीरव दैनंदिन हॉस्पिटल सेवेचा लाभ घेतला आहे.
१) १ डिसेंबर पासून सलग सहा महिने दाखल अथवा उपचार घेणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारचे एक्स- रे – १०० /- रुपये,
( २) सर्व प्रकारच्या सोनोग्राफी – ४००/- रुपये,
(३) सर्वं प्रकारचे केसपेपर-मोफत
( ४ ) फिजिओथेरपी , ॲंजिओग्राफी, ॲंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी – शासकिय सवलती नुसार मोफत
( ५ ) गरजेचे औषधे खरेदीवर २०% सूट
( ६ ) सी.टी स्कॅन,व लॅब तपासणीत ५० % सूट
( ७ ) एन. आय .सी.यू. सेवा – संपूर्ण मोफत
( ८ ) जनरल वार्ड अंतर्गत सर्वं प्रकारच्या चार्जेस वर ५०% सवलत
(९) दंत रोगप्रतिकारक रुटकॅन – १००० रूपये
(१०) दात साफ करणे मोफत सेवा देण्यात येत असल्याची माहिती देवून ॐ गुरूदेव श्री जंगली महाराज ट्रस्ट अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी या आरोग्य सेवेचा लाभ जनतेने घ्यावा असे कळकळीचे आवाहन केले.