कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वावलंबनातून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यांकडून कार्यक्षेत्रात नंदनवन – आमदार आशुतोष काळे
संपादक - अरुण आहेर

कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वावलंबनातून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यांकडून कार्यक्षेत्रात नंदनवन – आमदार आशुतोष काळे
🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल
कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे आणि आमदार अशोकदादा काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली गत चाळीस वर्षापासून अत्यंत जटील परिस्थितीत सतत विविध खर्चात बचत स्वावलंबनातून कायमस्वरूपी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ऊस उत्पादकांना अहिल्या नगर जिल्ह्यात विक्रमी भाव देण्यात यशस्वी ठरला तर कारखाना कार्यक्षेत्राचे नंदनवन करण्यात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार आमदार व कारखाना अध्यक्ष आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्प भुमीपुजन प्रसंगी बोलताना काढले .
सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती (को – जनरेशन) प्रकल्पाचे भूमिपूजन आज कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या अध्यतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभहस्ते पूजा करुन पार पडले.
यावेळी आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले,
बदलत्या काळाचे भान उओळखून कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि माजी आमदार अशोक दादा काळे यांनी स्वावलंबनातून कमीत कमी परीश्रमातून व विविध बचतीच्या माध्यमातून गौरवास्पद यश कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनात राबविले असून भावी काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावू अशी ठाम ग्वाही दिली.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ,अॅड. राहुल रोहमारे, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, सौ. वत्सला जाधव, सौ. इंदु शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने, प्र. कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.