Breaking
ब्रेकिंग

नारायण शेठ अग्रवाल , कोपरगावला लाभलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

0 0 5 1 3 3

नारायण शेठ अग्रवाल ,

कोपरगावला लाभलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

जवळपास 50 ते 55 वर्षांपूर्वी पॅकेट चहा चा प्रभाव ग्राहकांच्या मनावर असतांना स्व. गुलाब शेठ व बंधू नारायण शेठ , जगदीश शेठ या बांधवांनी अग्रवाल चहा नावाने धाडसी पाउल टाकले .

आणि बघता बघता ग्राहकांच्या *मनाचा असा ताबा घेतला की* , विदेशी आणि स्वदेशी ब्रँड च्या चहा ची मार्केट मधील मोनोपॉलि संपुष्टात आली

या बांधवांनी सुट्या चहाच्या व्यवसायाच्या माध्यमातुन जनमानसांत आपल्या गोड स्वभावाने अशी काही नाती जमवली आणि आजतागायत टिकवली देखील

*कोणतीही सामाजिक जबाबदारी च्या स्वतःहून स्विकारनारे नारायण शेठ कोपरगाव च्या पेठेत आज सर्वश्रुत आहेत*.

जेष्ठ नेते स्व. शंकरराव जी
कोल्हे साहेबांचे मानसपुत्र म्हणुन , आणि जेष्ठ पत्रकार स्व. सी.बी.गंगवाल साहेबांच्या पत्रकारितेचा एक भाग म्हणुन कार्य करणारे नारायण शेठ जेथे जातील तेथे संगठन करणे आणि सनदशीर मार्गाने लढणारे एक संयमी नेतृत्व म्हणुन ओळखले जाऊ लागले*.

*संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या चांगल्या गुणांचे कौतुक आपल्या लेखणीने लिहून त्याच्या वाढदिवसाला संस्मरणीय बनविण्याच्या त्यांचा हातखंडा तर कौतुकास्पद असाच आहे

अग्रवाल चहाच्या उत्तुंग सफलता मिळवून आज कोपरगाव च्या वैभवात भर पडेल असे शोरूम सुरू करून कोपरगाव बदलतय याची प्रचिती येते

अत्यंत हुशार पत्नी, मुलगा, सून ,नातू, नात यांच्या साथीने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यापारी अशा प्रत्येक क्षेत्रात या परिवाराने आजपर्यंत साध्य केलेली प्रगती भविष्यात देखील अशीच होत राहो याच शुभेच्छा*.
— सुधीर डागा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे