राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ‘गुडमा कायलो’ व्यक्तिरेखा साकारलेल्या ईशान संदीप कोयटे ला अभिनयाचे प्रथम पारितोषिक
राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत ‘गुडमा कायलो’ व्यक्तिरेखा साकारलेल्या ईशान संदीप कोयटे ला अभिनयाचे प्रथम पारितोषिक
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय २० व्या बालनाट्य स्पर्धेत धनंजय सरदेशपांडे लिखित, समता इंटरनॅशनल स्कूल प्रस्तुत, स्कूलचे कला शिक्षक डॉ.किरण लद्दे दिग्दर्शित ‘एलियन्स द ग्रेट’ या बालनाट्यात ईशान संदीप कोयटे यांनी ‘गुडमा कायलो’ ची व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे साकारून अभिनयात प्रथम पारितोषिक मिळाले असून कोपरगाव व समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा नाट्य क्षेत्रातही राज्य पातळीवर फडकविलेला आहे.
एलियन्स द ग्रेट या बाल नाटिकेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या १२ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यातील कैवल्य, चारू, संकेत, तन्वी, साक्षी, शारदा यांची भूमिका अनुक्रमे समर राजपूत, ज्ञानेश भुतडा, आदिश आचार्य, दिव्यांशी लाडे, रुमी जाधव, रुक्मिणी जपे यांनी साकारली. एलियन्स १,२,३ ची व्यक्तिरेखा अनुक्रमे शर्वरी गाडे, देवव्रत साखरे, साई पगार यांनी साकारली तर बातमीदार १,२ ची भूमिका अनुक्रमे रुजूला काळे, ओवी जपे व हवालदार (शांता ) ची भूमिका शांभवी देशमुख आणि गुडमा कायलो ची व्यक्तिरेखा ईशान कोयटे याने साकारली होती.
अहमदनगर येथील माऊली सांस्कृतिक सभागृहात ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या २० व्या विभागीय बालनाट्य स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या बाल कलाकारांनी सादर केली होती.
ईशान कोयटे याने अभिनयात मिळविलेल्या प्रथम पारितोषिका बद्दल व समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्या बद्दल स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती अनघा वैद्य, विश्वनाथ निळे, प्रवीण अहिरे यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी समता इंटरनॅशनल स्कूल ला सदिच्छा भेट दिली असता नाटीकेतील अभिनयात प्रथम पारितोषिक विजेता ईशान कोयटे व दिग्दर्शक किरण लद्दे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्या हर्षालता शर्मा, विजय गोयल, शिक्षिका सारिका अग्रवाल, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशा बद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.