Breaking
ब्रेकिंग

ओमप्रकाश कोयटे यांच्या यशस्वी कर्तृत्वाने देशातील सहकारी पतसंस्था चळवळीस समता पतसंस्था रुपाने बावनकशी परीस लाभला— संदीप कोयटे

0 0 1 1 6 3

 

ओमप्रकाश कोयटे यांच्या यशस्वी कर्तृत्वाने देशातील सहकारी पतसंस्था चळवळीस समता पतसंस्था रुपाने बावनकशी परीस लाभला— संदीप कोयटे

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क


कोपरगाव — महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या समता पतसंस्थेने ३१ डिसेंबर २०२३ वर्षाखेरीस ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा संरक्षित टप्पा पार केला असून सहकारी पतसंस्था चळवळीत हा टप्पा एक विक्रम मानला जातो समता सहकारी पतसंस्थेने स्वत;च्या प्रगती बरोबर माजी नगराध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या प्रत्यक्ष सहभागातून गत पाच वर्षांपासून अनाथ ,अप़ग असहाय्य बेवारस एक हजार लोकांना घरपोच मोफत भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे .


समता पतसंस्थेचे सहकार्याने दानशूर साईभक्त मदतीने श्रीक्षेत्र शिर्डी येथे श्रीसाईआश्रलयामध्ये 150 अंध, अपंग, बेवारस , निराधार,गरजू 150 मुलें -मुली , 70 वयोवृद्ध महिला पुरुष यांचा सांभाळ व्यवस्थापक गणेश दळवी करीत आहे.


कोपरगांव तालुका व्यापारी संघटना आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या मदतीने कोपरगाव बस स्थानकात सुशोभीकरण,स्वच्छता पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा सतत केला जात आहे.


ग्रामीण जनतेला अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निर्मिती घडवून सौ. स्वाती कोयटे यांच्या अथक परिश्रमाने स्थानिक ते जागतिक पातळीवर अत्याधुनिक शिक्षण,मैदानी खेळांच्या, बुध्दी कौशल्य सांस्कृतिक,आदी विविध प्रकारच्या मैदानी खुल्या आणि इन डोअर हॉल स्पर्धात समता इंटरनॅशनल स्कूल ने जागतिक नकाशावर समता आणि देशांचे नाव कायमस्वरूपी झळकवले आहे. सामान्य माणूस केंद्रीभूत मानून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विकासात्मक केंद्रीभूतअभ्यासक्रम राबविले आहे आपलीजागतिक ओळख समता सहकारी पतस़स्थेने कायमस्वरूपी अधोरेखित केली आहे.

याचबळावर ओमप्रकाश कोयटे यांनी तीनशे किलोमीटर पेक्षा जादा प्रवास सरासरी रोज संपूर्ण महाराष्ट् देश आंतरराष्ट्रीय पातळीवर करुन जगासमोर सहकारी पतसंस्थांच्या जीवघेण्या संघर्षाचा आढावा मांडतांना विविध देशात राज्यात, जिल्ह्यात अत्याधुनिक तंञज्ञान, जागतिक स्तरावर सहकारी पतसंस्था व्यवस्थापन, कामकाज, ठेव संकलन,कर्ज वितरणात सुरक्षितता, स्थानिक कायदे व शासनाची धोरणे, पतसंस्थांना विविध अडचणी, अत्याधुनिक तंत्रज्ञान व विकसित कामकाज पध्दतीचा वापर बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ व यंत्रसामुग्री वापरासाठी पतसंस्थेचे सबलीकरण ,राजकिय — सामाजिक प्रभाव आर्थिक संकट, ग्राहक संपर्क आदी पातळीवर सर्वांना संघटीत करून समस्या सोडविण्यासाठी कधीच तडजोड केली नाही. सहकारी पतसंस्था बळकटी करणातून आशियाई पतसंस्था फेडरेशन स्थापण्यात समाधान न मानता जागतिक पातळीवर संघटना उभारण्यासाठी काका कोयटे यांनी सर्वस्व पणाला लावून पतसंस्था चळवळीस पाठबळ पुरवले आहे‌ जागतिक पातळीवर झळकतांना समता पतसंस्थेच्या मदतीने कोपरगाव तालुक्यात रोजगार निर्मिती, लहान -मोठे व्यापारी, महिला, बेरोजगार तरुणांना संघटित करून कायमस्वरूपी दुष्काळ,अतीवृष्टी, पिण्याचे पाण्याची टंचाई, प्रद्दुषण, आदी संकटावर मात केली आहे. पर्यावरण संवर्धनातून स्थानिक बाजारपेठेत विविध व्यावसायिक वृध्दीचे यशस्वी उपक्रम राबवून ,महापूर, कोरोना आदीच्या पातळीवर सामाजिक सहकार्यात सिंहांचा वाटा उचलतांना समता सहकारी पतसंस्थेने आपले अव्वल स्थान कायम राखले एवढ्यावरच न थांबता आगामी काळात कोपरगांव तालुक्याचा पठारी प्रदेश हा संपूर्ण देशाला सर्व दिशांना मध्यवर्ती आहे. याच बरोबर दुहेरी मध्यवर्ती रेल्वे मार्ग , समृद्धी महामार्ग आगामी बुलेट रेल्वे मार्ग, नवीन औद्योगिक वसाहत, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित विवीध सेवा पुरविणारी हब निर्मिती, या परिसरातील विकासात्मक सेवेतून शेतकरी व उद्योजक यांना आपला उत्पादीत माल योग्य वेळी योग्य परतावा ,कमीतकमी मानवी नैसर्गिक स्वरुपातील नुकसान मुक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार, सहकारी पतसंस्था, विविध खाजगी , सहकारी, शासकीय अर्थसंस्था , उत्पादक, वितरक ,व्यापारी व जनसहभागातून कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्ग प्रकल्पातील दोन नव्या औद्योगिक नगरात सौरऊर्जा वापरून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा असलेल्या हजारो टन माल साठवणुकीची गोदामे व निर्जलीकरणासह शीतगृहेउभारण्यासाठी आणि या भागातील ग्रामीण शहरी उत्पादन देशांबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यात तातडीने ग्राकांना पोहचविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली समता पतसंस्था केंद्र व राज्य शासनाकडे सर्व लाभधारक यांच्या सहकार्यातून कायम पाठपुरावा करणार असल्याची ठाम ग्वाही. समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

समता नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२३ ची आर्थिक स्थिती आढावा बैठक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संस्थेचे संचालक जितूभाई शहा, अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी आदींच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ३१ डिसेंबर २०२३ अखेर ९०० कोटी रुपयांच्या ठेवी, ६८७ कोटी रुपये कर्ज वितरण व २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक असून एकूण कर्ज वाटपात ३५३ कोटी रुपयांचे सोने तारण कर्ज असल्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांमध्ये सोनेतारण कर्ज वाटपामध्ये नवा विक्रम समता पतसंस्थेने निर्माण केला आहे. समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.७१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी कायमस्वरूपी सुरक्षित आहे
या सर्व समता सहकारी पतसंस्था व्यवस्थापन, कामकाजात, सामाजिक कामात समता पतसंस्थेचे संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आदींचे महत्वपूर्ण योगदान असून कोयटे परिवाराचा ही खारीचा वाटा असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे