Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

संजीवनी नोकरी महोत्सव २०२४ ला एकाच छताखाली एका दिवसात ९६८०इच्छूक युवा उपस्थितीतील ६८६५ युवकांच्या मुलाखती नंतर ३१२४ युवकांना तातडीने नोकरी नियुक्ती पत्र देण्यात आले अशा स्वरुपात दरवर्षी सर्व सुविधा पुरविणाऱ्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार – विवेक कोल्हे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 8 8 7

संजीवनी नोकरी महोत्सव २०२४ ला एकाच छताखाली एका दिवसात ९६८०इच्छूक युवा उपस्थितीतील ६८६५ युवकांच्या मुलाखती नंतर ३१२४ युवकांना तातडीने नोकरी नियुक्ती पत्र देण्यात आले अशा स्वरुपात दरवर्षी सर्व सुविधा पुरविणाऱ्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार — विवेक कोल्हे

🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगांव – वाढती बेरोजगारी, सुशिक्षित युवा-युवतींचे निर्माण झालेले प्रश्न, नागरीकीकरण- औद्योगिकीकरणांमुळे शेती सिंचन पाण्यात झालेली घट आणि माजीमंत्री स्व शंकररावजी कोल्हे यांचा सामाजिक कार्याचा वसा घेऊन सुशिक्षीत बेरोजगारांचे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमांतून अहमदनगर जिल्हयातील पहिल्या संजीवनी नोकरी मेळाव्यात ९६८० उपस्थित इच्छूक युवकापैकी ६८६५मुलाखत देणाऱ्या युवकामधून ३१२४ यशस्वी उमेदवारांना नोकरी नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले तर २८१५ युवकांच्या विविध कारणांमुळे तातडीने मुलाखती घेतल्या जातील. तसेच अनुत्तीर्ण उमेदवारासाठीयोग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणातून नोकरी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. या कार्यामधून युवकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांची रोजीरोटी सुरळीत चालावी हा विचार घेऊन हे कार्य सुरु केले ते आता थांबणार नाही असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय इपकोचे संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव येथे तालुक्यातील ६० हजार सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार पुरविण्यासाठी संजीवनी उद्योग समूह संजीवनी युवा प्रतिष्ठान, आणि संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विवेक कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते तर संजीवनीग्रामिण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे ‍कार्यक्रम अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

८१८० ऑनलाईन नोंदणी व मुलाखत स्थळी ऐनवेळी उपस्थिती १५०० असे एकूण ९६८० युवकांचा प्रतिसाद मिळाला.पैकी ६८६५ मुलाखती पार पडल्या तर काही वेळेअभावी येत्या काळात विभागनिहाय पार पडणार आहे.यातील २२३४ नोकरी प्रमाणपत्र व या व्यतिरिक्त ८९० सेकंड राऊंडसाठी सिलेक्ट झाले असून एकूण ३१२४ नोकऱ्या आज वितरीत झाल्या आहे.उर्वरित सर्वांना जॉब कार्ड प्राप्त झाले असून त्यांना दर सोमवारी नोकरीचे उपलब्धी संदेश मिळणार आहे.या महोत्सवात ४.२० लाखाचे पॅकेज गेले असून सेकंड राऊंड मद्ये गेलेल्या युवक युवतींना अधिक रकमेचे पॅकेज मिळू शकणार आहे.

तालुक्यातील कोपरगांव बेट भागात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास कार्यस्थळावर शनिवारी संजीवनी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उद्‌घाटन करताना ते बोलत होते. प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते मुलाखत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटचे कार्यकारी विश्वस्थ अमितदादा कोल्हे होते.

श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, वाढत्या बिगरसिंचन पाणी आरक्षणामुळे बारमाही गोदावरी कालव्यावर शेती अडचणीत सापडली त्यामुळे त्यावर अवलंबुन असणारे व्यवसाय देखील अडचणीत आले त्यासाठी वॉटरलेस इंडस्ट्री निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात सर्वप्रथम संजीवनी बीपीओ कॉल सेंटर उघडुन त्यातून शेकडो सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम निर्माण केले.

माजीमंत्री स्व शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव परिसराला शैक्षणिक हब बनविले शेजारच्या शिर्डी साईबाबाचे अध्यात्मीक पर्यटन आणि येवला येथील टेक्स्टाईल उद्योग असा त्रिकोण साधण्याचा प्रयत्न करून येथील युवकांच्या हाताला काम देण्यांसाठी पुढाकार घेतला.

कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने शंभर हुन अधिक नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींना येथे बोलावून रोजगार मेळावा भरवून त्यांना नोकऱ्या देण्यासाठी पुढाकार घेतला यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांचे विशेष मार्गदर्शन लाभ लाभाले. कोपरगांव तालुक्यात १८ ते ३० वयोगटातील ६० हजार युवक युवती असुन त्यांच्यापुढे रोजगारासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यासाठी औद्योगिक वसाहत निर्मीतीसाठी प्रयत्न केले. या महोत्सवात ज्या युवक युवतीची नोकरीसाठी निवड झाली त्यांचे अभिनंदन व ज्यांची निवड झाली नाही त्यांच्यासाठी जॉब कार्ड देऊन विविध ठिकाणी असणाऱ्या नोकरींच्या संधीची माहिती एका लिंकद्वारे दर सोमवारी या सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, तेव्हा कुणीही निराश होऊ नये, हा उपक्रम आपण दरवर्षी भरविणार आहोत, युवकांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे कुटुं‌बियांच्या आर्थिक क्रयशक्तीत भर घालावी असेही ते म्हणाले.

यावेळी खऱ्या विकासाला आपला विवेक पाहिजे या चित्रफितीचे अनावरण करण्यांत आले.
याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,डॉ.मिलिंददादा कोल्हे,प्रणव पवार,उद्योजक राजेश ठोळे, संजय भन्साळी, हदयरोगतज्ञ डॉ. दत्तात्रय मुळे, आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड, गणेशाचे एकनाथ गोंदकर, व्यापारी असोसिएशनचे सुधीर डागा, आत्मा मालिक चे सचिव हनुमंतराव भोंगळे, के जे सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. सी. ठाणगे, गणेश वाणी, एस जे एस ग्रुपचे प्रसाद कातकडे, माजी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, रियाज शेख सर, रिपाईचे दिपक गायकवाड,जितेंद्र रनशुर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना , संजीवनी एज्युकेशन सोसायटी यांच्यासह संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी अधिकारी , कर्मचारी कार्यकर्ते,संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक,नोकरीसाठी मुलाखतीस आलेले हजारो युवक युवती त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवसभर सुरू असणाऱ्या या नोकरी महोत्सवात विविध संघटनाचे आजी माजी पदाधिकारी,नेते यांनी भेटी देऊन उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केले. संजीवनी नोकरी महोत्सवासाठी सुमारे दहा हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी करत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजेरी लावली, यात दिव्यांग बांधवांचाही समावेश होता., मुलाखतीत ज्यांची निवड झाली त्यांना यावेळी तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे