निकोप स्पर्धेतून सर्वांगीण विकासासाठी बळ मिळते सौ.पुष्पाताई काळे

निकोप स्पर्धेतून सर्वांगीण विकासासाठी बळ मिळते सौ.पुष्पाताई काळे
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव. —
स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जायचे आहे. स्पर्धेशिवाय जगण्याला मजा नाही आणि स्पर्धा असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही.त्यामुळे स्पर्धेचे नेहमीच स्वागत करा परंतु स्पर्धेत सहभागी होतांना स्पर्धा हि निकोप असावी त्यामुळे स्पर्धा संपली की, ज्ञान, प्रेम, आणि मैत्री वृद्धिंगत होवून एकमेकांप्रती आदर वाढतांना सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बळ,मिळते असे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका व राधाबाई काळे कन्या विद्या मदिर स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी केले.
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कला,विज्ञान कनिष्ट महाविद्यालय सुरेगाव-कोळपेवाडी येथे भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन सौ.पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या.
या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, माजी संचालक अरुणराव चंद्रे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य कचरू कोळपे, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, सुरेगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुमनताई कोळपे,उपसरपंच सौ.सीमाताई कदम,श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य सुखदेव काळे, श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे,बाळासाहेब ढोमसे,रयत बँकेचे व्हा.चेअरमन दिलीप डहाळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
त्या पुढे म्हणाल्या की, स्पर्धा म्हणजे एकाच गोष्टीसाठी चालणारी चढाओढ. मात्र हि चढाओढ किंवा स्पर्धा निकोप असावी, मन देखील निष्पाप असावे