सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान संजीवनी वाणिज्य गौतम कला महाविद्यालयात १७ फेब्रुवारी रोजी वार्षिक गुणगौरव समारंभ प्राचार्य :— डॉ. रमेश सानप
सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान संजीवनी वाणिज्य गौतम कला महाविद्यालयात १७ फेब्रुवारी रोजी वार्षिक गुणगौरव समारंभ प्राचार्य :— डॉ. रमेश सानप
कोपरगांव :—
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान संजीवनी वाणिज्य गौतम कला महाविद्यालयात शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणारा ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ रमेश सानप यांनी दिली.
महाविद्यालयाने नुकतेच ३.६९ या उच्चतम गुणांसह नॅकचे A++ हे मानांकन प्राप्त केले आहे. महाविद्यालयातील विविध बाबींबरोबरच शिक्षक-शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन केलेली विशेष कामगिरी, मिळविलेले पुरस्कार, पारितोषिके , क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात दाखविलेले विशेष नैपुण्य यांचा यात मोठा वाटा आहे.
यामुळे उच्चतम मानांकनाच्या आनंदी व उत्साही पार्श्वभूमीवर होणाऱ्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे विशेष महत्त्व आहे.
या समारंभाचे अध्यक्षपद रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.ॲड. भगीरथ शिंदे हे भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.प्रिं.डॉ.ज्ञानदेव म्हस्के हे मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि जनरल बॉडी सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व गुणवंत, यशस्वी विद्यार्थ्यांसह पालक, विद्यार्थी व परिसरातील नागरिक या सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
या समारंभात अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका स्व. सौ. सुशिला माई शंकरराव काळे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांचा सन्मान आणि पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याने या वकृत्व स्पर्धकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन प्रा. डॉ. रमेश सानप यांनी केले आहे.