एस. एस. जी. एम. महाविद्यालयाला नॅकचे ३.६९ श्रेणीसह A++ मानांकन
एस. एस. जी. एम. महाविद्यालयाला नॅकचे ३.६९ श्रेणीसह A++ मानांकन
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते लवकरच ४ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित सुविधा असलेल्या दुमजली इमारतीत सर्वोच्च गुणवत्तेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार या यशाबद्दल कोपरगांवात जल्लोष
कोपरगाव :—– रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव महाविद्यालयाने नुकतेच नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडीटेशन कौन्सिलचे चौथे सायकल पूर्ण केले. त्यात महाविद्यालयाने ३.६९(CGPA) श्रेणीसह A++ मानांकन प्राप्त केले.
राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद अर्थात नॅक समितीने महाविद्यालयास ३० व ३१ ऑगस्ट२०२३ रोजी भेट दिली होती. मात्र नॅकच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परत एकदा नॅक समितीकडून भेट दिली जाईल,असे कळविण्यात आलेले होते.त्यानुसार नॅक समितीने महाविद्यालयाला पुन्हा दि.१४ व १५ डिसेंबर २०२३ रोजी भेट दिली. समितीचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ.जोगेनचंद्र कलिता (प्रोफेसर, गुवाहाटी युनिव्हर्सिटी, आसाम),डॉ.शिशिर कुमार (प्रोफेसर, बाबासाहेब भीमराव आंबेडकर सेन्ट्रल युनिव्हर्सिटी लखनऊ,उत्तर प्रदेश) प्रिन्सिपल डॉ.चंदना भट्टाचार्याजी (सेवानिवृत्त प्राचार्य, महिला कॉलेज शिलॉंग, मेघालय) यांनी दोन दिवशीय भेटीत महाविद्यालयाची सूक्ष्म तपासणी केली.
नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रिडीटेशन कौन्सिलने (नॅक) घालून दिलेल्या निकषानुसार शैक्षणिक प्रक्रियेत महाविद्यालयाने मागील पाच वर्षात केलेली कामगिरी ,अभ्यासक्रमाची निवड, शॉर्ट टर्म कोर्स ,शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा सदस्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शोध निबंधाचे प्रकाशन, प्राध्यापकांना मिळालेले पेटंट, मूलभूत सुविधा व साधनांची स्थिती, प्रशासन, आर्थिक स्थिती, ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपकरणे, संगणक यासारख्या पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा ‘शिक्षक आपल्या दारी’ ( Teacher at your door ), ‘कमवा आणि शिका योजना’, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सांस्कृतिक उपक्रम , राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, बोटॉनिक गार्डन,कंपोस्ट खत निर्मिती, जैविक गॅस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट इ. महाविद्यालयातील उपक्रम व महाविद्यालयात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी या सर्वांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचे काटेकोर निरीक्षण, शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने समितीला जमेच्या बाजू ठरल्या. समितीने आजी -माजी विद्यार्थी, पालक,शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध समिती प्रमुख यांच्याशी बैठका घेऊन सुसंवाद साधला.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविद्यालयातील सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले. उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे यांनी महाविद्यालयाच्या विकास समिती चेअरमन पदाची जबाबदारी घेतल्यानंतर महाविद्यालयाच्या विस्तारासाठी मौलिक सूचना केल्या. विद्यार्थी, प्राध्यापक, पालक यांच्या बैठका घेऊन त्यांना उत्तेजन दिले त्यांच्यात आत्मविश्वास जागवला. एस .एस . जी . एम .महाविद्यालय हे एक अतिशय प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालय म्हणून प्रख्यात आहे, हे निदर्शनास आणून दिले. दिवसेंदिवस महाविद्यालयाची होत असलेली संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ लक्षात घेऊन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण कोर्सेस सुरू केले.
त्यामध्ये बीबीए, बीएससी कॉम्प्युटर सायन्स, वनस्पती शास्त्र संशोधन केंद्र इत्यादींचा समावेश होतो. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या भौतिक यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने साडेचार कोटींची वीस हजार स्क्वेअर फुटाची दोन मजली इमारत, अनेक वर्ग आणि खुल्या प्रयोगशाळा असलेल्या इमारतीसहनव्या चार कोटी रुपये खर्चून इमारतीची पायाभरणी करून सहा महिन्यांत रयत संस्था अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते सर्वोच्च गुणवत्तेचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे क्लास रूम, क्रीडांगण, ऑडिटोरियम हॉल यांना जेवढे महत्त्व तेवढेच महत्त्व कॅन्टीनला देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच कॉलेज परिसरात पौष्टिक आणि चविष्ट आहार मिळावा म्हणून उत्तम कॉलेज कॅन्टीन सुरू केले .तसेच मुलींच्या वसतिगृहात सर्व सोयींनी युक्त अशा डायनिंग हॉलची व्यवस्था केली आहे.
नॅक समिती समोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. सानप यांनी महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. आय. क्यू.ए.सी.(IQAC) चे समन्वयक प्रा. डॉ. निलेश मालपुरे यांनी नॅक समितीचे चेअरमन व सदस्य यांच्याशी संवाद साधतांना महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम,शैक्षणिक सुविधा प्रभावीपणे समितीच्या निदर्शनास आणून दिल्या.
नॅक पिअर टीम यांच्याबरोबर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन .ॲड.भगीरथ शिंदे, संस्थेचे सचिव श्री. विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेक कोल्हे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. संदीप वर्पे.सुनील गंगुले ,.महेंद्रशेठ कालेआदि मान्यवरांचे सहकार्य लाभले. याबद्दल प्राचार्य डॉ रमेश सानप यांनी महाविद्यालयाच्या या उत्तुंग व अभिमानास्पद यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.ॲड. भगीरथ शिंदे ,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन,मच्छिंद्र रोहमारे, .बाळासाहेब कदम,.श्री अरुण चंद्रे, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा.ॲड. संदीप वर्पे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्या मा.सौ.चैतालीताई काळे, विवेक कोल्हे, सुनील गंगुले, महेंद्रकुमार काले, बाळासाहेब आव्हाड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, आय. क्यू.ए.सी. समन्वयक,कार्यालय अधीक्षक ,सर्व विभाग प्रमुख, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थीनी देणगीदार आदींचे आभार मानले.