Breaking
ब्रेकिंग

पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी आत्मभारत स्वप्नपूर्ती साठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा देशातील पहिला बायो सीएनजी प्रकल्प देशाला प्रेरणादायी ठरला असून कोल्हे परिवाराचे सक्रिय कार्य सर्वांगीण देश विकासाच्या चक्रवर्ती अर्थव्यवस्थेला आदर्श मॉडेल — केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री नामदार अमित शहा

0 0 4 2 4 2

पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी आत्मभारत स्वप्नपूर्ती साठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा देशातील पहिला बायो सीएनजी प्रकल्प देशाला
प्रेरणादायी ठरला असून कोल्हे परिवाराचे सक्रिय कार्य सर्वांगीण देश विकासाच्या चक्रवर्ती अर्थव्यवस्थेला आदर्श मॉडेल — केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री नामदार अमित शहा

कोपरगांव :

महाराष्ट्र राज्याने सहकार चळवळीचे बीज रोवलं आज त्याचा विशाल वटवृक्ष झाला असुन संपुर्ण देश त्याची फळे चाखत आहे, सहकारमहर्षी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकार क्षेत्रात असंख्य नाविन्यपुर्ण प्रयोग करत देश विकासाच्या चक्रवर्ती अर्थव्यवस्थेला बळ देवतांना देशाच्या साखर कारखानदारीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यांने अनेक बदल घडवून आणल्याने त्यांच्या कृतीला मी सर्वप्रथम वंदन करतो, तसेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोल्हे परिवारासह नातु विवेक कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात देशातील पहिला बायो सीएनजी आणि पोटॅश खत प्रकल्प सुरू केला तो सर्व कारखान्यांना प्रेरणास्त्रोत्र बनला असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री नामदार अमित शहा यांनी काढले .

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमीत्त तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशातील पहिल्या सहकारी तत्वावरील बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत प्रकल्पाचे केंद्रीय सहकारमंत्री नामदार अमित शहा, केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री नामदार गिरीष महाजन, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजप माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना युवा अध्यक्ष विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतींने रविवारी करण्यांत आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ, भरजरी पैठणी फेटा, शेतक-यांच्या शेतीची प्रतिकृती बैलगाडी व बैलजोडी देवुन करण्यात आला. बिपिनदादा कोल्हे यांनी प्रास्तविकात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आजवर केलेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. कोल्हे कारखान्याच्या 1960 ते 2025 या 65 वर्षाच्या कार किर्दीचा कीर्तीचा इतिहास चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला.

युवानेते विवेक कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह तथा सहकारमंत्री अमित शहा व सर्व केंद्रीय मंत्रीमंडळाने देशातील प्रत्येक नागरिक शेतक-यांसाठी ज्या ज्या महत्वपुर्ण योजना राबविल्या, सहकारी साखर कारखान्यांचा आयकर माफ केला त्या सर्वाबद्दल धन्यवादचा नारा दिला तो उपस्थितांना जास्त भावला.


संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे सर्वसंचालक, तसेच कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, ग्रामिण अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे, देशातील प्रत्येक शेतक-याला शाश्वत भाव मिळाला पाहिजे, देशाच्या सुरक्षीततेबरोबरच सहकार क्षेत्राला पुढे नेण्यांचे पाठबळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व सहकारी मंत्री करत असुन अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांचे अलिकडे जे अतोनात नुकसान झाले आहे त्याला आधार देण्यासाठी ख-या अर्थाने केंद्र व राज्य शासन मायबाप म्हणून भक्कमपणे उभे राहिल अशी ग्वाही देवुन ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारतात संजीवनीने जे पाऊल उचलले ते सहकाराला दिशा देणारे आहे. संपूर्ण देशात आज युवा शक्तीचा बोलबाला आहे आणि हीच शक्ती तुम्हां-आम्हां सर्वांना प्रगतीच्या दिशेने घेवुन जाईल.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी कार्यस्थळावर आयोजित केलेल्या दुध दरवाढीच्या राज्यस्तरीय मेळाव्यापासुन त्यांचा आणि माझा थेट संबंध आला, त्यांच्या बरोबर वसंतदादा शुगर इन्टीटयुट, राज्य साखर संघ, रयत शिक्षण संस्था आदि ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली, अशा हुशार व्यक्तीमत्वाच्या आणि संजीवनीत देशात सर्वप्रथम साखरेबरोबरच विविध उपपदार्थ निर्मीतीचा पाया रचणा-या शंकरराव कोल्हे यांच्याबरोबर साखर कारखानदारीचे नवनविन तंत्रज्ञान शिकण्यासाठी परदेशात जायला मिळाले. सहकाराचा मुख्य केंद्रबिंदु अहिल्यानगर जिल्हा आहे. बिपिनदादा कोल्हे यांनी या सहकार बिजाला वाढविण्यांचे काम केले व युवानेते विवेक कोल्हेंनी नाविन्याचा शोध घेत आजोबांची दुरदृष्टी बायो सीएनजी प्रकल्पात परावर्तीत करून शेतक-यांना आधार देण्यांचे काम सुरू केले त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा नारा देवुन सहकार क्षेत्राला पुढे नेण्यांसाठी केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून त्याची धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देवुन शेतकरी अन्नदाता ऊर्जादाता झाला पाहिजे म्हणून जी पावले उचलली ती ख-या अर्थाने ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहे.
आज पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम आपल्या राज्याला भोगावे लागत आहे, त्यातुन शेतक-यांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे रब्बीपीकाची मानसिकता संपली आहे.४० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. माझ्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व सर्व मंत्रीमंडळाने शेतक-यांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे, या आपत्तीग्रस्त शेतक-यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी बळ देवुन सर्वतोपरी आर्थीक सहकार्य करू अशी ग्वाही दिली.

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा पुढे म्हणाले की, आपल्या भारत देशाला आत्मनिर्भर करण्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वापराचा जो नारा दिला तो प्रत्येकांने कृतीत आणावा. येथील शेतक-यांनी उत्पादित केलेल्या कृषी, डाळ, हरभरासह अन्य कृषीमालाचा नाफेड व एनसीसीएल बरोबर करार केला तर त्याला निश्चितच जास्तीचा हमीभाव देवु.
शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे त्याच्या सुख-दुःखात केंद्र व राज्य शासन सर्वतोपरी पाठीशी आहे. आज पर्यावरण बदलाचा मोठ्या प्रमाणांत फटका बसत आहे त्यासाठी एक झाड आपल्या देशासाठी व आईसाठी लावुन वृक्ष लावा वृक्ष जगवा हे अभियान यशस्वी करावे त्यातुन उद्याच्या पिढीचे भवितव्य निश्चितच चांगले होणार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने बायो सीएनजी प्रकल्प सुरू करून इतर कारखान्यापुढे आदर्श निर्माण केला आहे, एनसीडीसीच्या माध्यमांतुन या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करू. शेवटी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आभार मानले.

युवानेते विवेक कोल्हे यांचे राजकीय भविष्य उज्वल आहे त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची आम्हांस आठवण आहे तेंव्हा त्याची त्यांनी काळजी करू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सभास्थानी विवेक कोल्हे आगे बढोचा नारा असंख्य युवकांनी देताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरा कळ काढा. विवेक कोल्हे यांनी राजकारणांत जे पाऊल टाकले त्यासाठी आम्ही साथ देवु असे म्हणताच उपस्थितांनी टाळयांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे