Breaking
ब्रेकिंग

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा करिष्मा, विजयाचा कोपरगावमध्ये विजयोत्सव

0 0 4 4 8 8

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा करिष्मा, विजयाचा कोपरगावमध्ये विजयोत्सव

राज्यभर भाजपा जिंकले, कोपरगांवमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका निवडणुकांमध्ये दैदीप्यमान यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. हा विजय म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा, त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचा सशक्त कौल आहे.

या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कोपरगाव शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागांत आनंदोत्सवाचे वातावरण असून कार्यकर्ते व नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

यावेळी नगराध्यक्ष पराग संधान यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतीय जनता पार्टीवर संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असून पक्ष सातत्याने मोठे यश मिळवत आहे. कोपरगाव मतदारसंघातही बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला भरीव यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पेढे भरवत, ढोल-ताशांच्या गजरात “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” आणि “देवेंद्रजी फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण कोपरगाव परिसर दुमदुमून गेला होता.

या जल्लोषात उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, गटनेते प्रसाद आढाव, अमोल अजमेरे, संतोष शिंदे, सोनलताई अजमेरे, अनिताताई गाडे, अतुलशेठ काले, रवींद्र पाठक, विजयराव आढाव, संतोष गंगवाल, संतोष चवंडके,कलविंदरसिंग डडियाल, संजय पगारे, वैभव गिरमे, राहुल खरात, दीपक जपे, गोपी गायकवाड, सतीश रानोडे, संतोष शेजवळ, जयेश बडवे, अमित लोहाडे, सुशांत खैरे, धनंजय आढाव, राजेंद्र बागुल, खालिक कुरेशी, कैलास सोमासे, निसार शेख, शाम आहेर, लखन म्हस्के, फकीर मोहम्मद पहिलवान, मुक्तार पठाण, अश्रफ अत्तार, योगेश गंगवाल, संतोष साबळे, अनिल गायकवाड, रोशन शेजवळ, अभिषेक मंजुळ, शुभम सोनवणे, सुनील कुंडारे, प्रताप जोशी, संजय खरोटे, निलेश बोराडे, भैया नागरे, मनोज निलक, बंटी हलवाई, संतोष नेरे, स्वराज सूर्यवंशी, सौरभ होते, रोहिदास पाखरे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 4 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे