प्रसार माध्यमांच्या संपादक आणि पत्रकारांनी कोणत्याही प्रसंगी वृत्त संपादनात मनोरंजन साधन, न्यायाधीश, सल्लागार, पाठीराखा , हितशत्रूची भुमिका पार पाडू नये — सकाळ संपादक सम्राट फडणीस
प्रसार माध्यमांच्या संपादक आणि पत्रकारांनी कोणत्याही प्रसंगी वृत्त संपादनात मनोरंजन साधन, न्यायाधीश, सल्लागार, पाठीराखा , हितशत्रूची भुमिका पार पाडू नये — सकाळ संपादक सम्राट फडणीस
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव —
कालानुरूप आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीनुसार नैसर्गिक, भौतिक , मानसिक, विकासात्मक आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय बदल सतत घडत असतांना पत्रकार आणि संपादकांनी निरपेक्ष भावनेने संबंधित बातम्या माहिती,उपक्रम, लेख, अग्रलेख वार्तापत्र संपादनात अन्यायग्रस्त , लाभधारक, वंचित सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाधीश,सल्लागार, पाठीराखा, मनोरंजन साधन हितशत्रूची भूमिका पार पाडू नये. असे कळकळीचे आवाहन सकाळ वृत्तसेवा माध्यम संपादक सम्राट फडणीस यांनी पत्रकार दिनानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, गौतम उद्योग आणि शिक्षण
समूह,आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार अशोक काळे यांनी भूषविले.
यावेळी उपस्थित पत्रकारांना संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रम सुत्रसंचलन माजी संचालक अरुण चंद्रे, प्रास्तविक माजी संचालक कारभारी आगवण तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना सकाळ संपादक सम्राट फडणीस पुढे म्हणाले,
कोविडने प्रसारमाध्यमांवर जीवघेणा हल्ला केला. तर वाचक काय विचार करतो ,त्याला काय हवे हे प्रसार माध्यमे विसरून गेले. डिजिटल मनोरंजक माध्यमांचे अतिक्रमणे, टीआरपी व जाहिरात रेट्यामुळे वृत्तसेवा माध्यमे अडचणीत सापडली.
. नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री क्षमतेचे नेतृत्व असून या नेत्यांनी सतत जिह्यासह महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेसाठी फार मोठे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार सम्राट फडणीस यांनी काढले
यावेळी प्रमुख पाहुणे आमदार आशुतोष काळे यांनी नवनिर्माण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कायमस्वरूपी अवलंब करून सामान्य वंचित ग्रामीण शहरी जनतेला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे असे आवाहन आशुतोष काळे यांनी केले