Breaking
ब्रेकिंग

आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगांव बस आगारात 14 कोटींचे व्यापारी संकूल

0 0 1 8 4 6

आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगांव बस आगारात 14 कोटींचे व्यापारी संकूल


🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगांव. —
कोपरगाव बस आगारात किमान 100 व्यापारी गाळ्यांची उभारणी करण्यात यावी या 20 वर्षांनंतर यांची स्वप्नपूर्ती आमदार आशुतोष काळे यांच्या यशस्वी चिकाटीच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास जाणार असूनसंकुलाच्या 14 कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत .


विकसित कोपरगावचे स्वप्न सत्यात उतरवित पाणी प्रश्न, शहर विकासासह बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. बेरोजगार युवक व गरजूंना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आ. काळे यांचा पाठपुरावा सुरु आहे. 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी मागणी केली होती.

तत्पूर्वी तत्कालीन परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले होते. पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार एप्रिल 2022 मध्ये कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण व विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी त्यांनी बस स्थानक व्यापारी संकुलास मंजुरी दिली होती.

व्यापारी संकुलासाठी निधी मिळावा, यासाठी आ. काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. अखेर परिवहनने 14 कोटी रुपये निधी मंजूर केला. संकुलामुळे सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढणार आहे.

इलेक्ट्रिक कामाची स्वतंत्र निविदा लवकरच..!

व्यापारी संकुलाच्या 10 कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. उर्वरित इलेक्ट्रिक कामाची स्वतंत्र निविदा लवकरच प्रसिद्ध होईल. एकूण 14 कोटीचा निधी व्यापारी संकुलास मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 8 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे