Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित करमसी जेठाभाई सोमैया (वरिष्ठ) व कारभारी.भिमाजी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात २० व २१ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी भाषा चर्चा सत्र

संपादक - अरुण आहेर

0 0 1 7 0 4

कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित करमसी जेठाभाई सोमैया (वरिष्ठ) व कारभारी.भिमाजी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात २० व २१ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी भाषा चर्चा सत्र

🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगांव – करमसी जेठाभाई सौम्या ( वरिष्ठ) कारभारी भिमाजी रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या हिंदी विभाग व उत्तर प्रदेश हिंदी संस्थान,२० व २१ सप्टेंबरला भारतीय राष्ट्रीय हिंदी भाषा ज्ञान परंपरा व हिंदी कथा लखनऊ यांच्या साहित्य संयुक्त विद्यमाने “भारतीय ज्ञान परंपरा व हिंदी कथा साहित्य” वर राष्ट्रीय चर्चासत्र
या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय हिंदी चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.(डॉ) विजय ठाणगे यांनी दिली आहे.

चर्चासत्राचे उद्घाटन उत्तर प्रदेश हिंदी संस्थान लखनऊ चे निदेशक मा.आर.पी.सिंग, संस्थानच्या प्रधान संपादक डॉ.अमिता दुबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी विभागप्रमुख प्रो.(डॉ) सदानंद भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे.

भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आधारित दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रात एकूण आठ सत्र आयोजित केलेले असून यामध्ये भारतभरातून विविध मान्यवर व तज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहे. यामध्ये प्रो.(डॉ.) राममोहन पाठक- पूर्व कुलपति दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा चैन्नई, डॉ.सतीश पावडे- प्रदर्शनकारी कला विभाग महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा, डॉ. जितेंद्र कुमार तिवारी- निदेशक भारतीय ज्ञान संस्कृत एवं योग केंद्र मुंबई, डॉ. प्रियदर्शनी नारायण- अंग्रेजी और विदेशी भाषा विश्वविद्यालय हैदराबाद, प्रो.(डॉ.) अर्जुन चव्हाण- ज्येष्ठ हिंदी समीक्षक व साहित्यिक पूर्व अध्यक्ष हिंदी विभाग शिवाजी विश्वविद्यालय कोल्हापुर, डॉ. जवाहर कर्णावट- सलाहाकार प्रवासी भारतीय साहित्य एवं संस्कृती शोध केंद्र भोपाळ, डॉ.रविंद्र कात्यायन- मुंबई, डॉ.गेलजी भाटिया- गुजरात यांचा समावेश आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय हिंदी चर्चासत्राचा समारोप डॉ. विपिन कुमार- राष्ट्रीय महासचिव विश्व हिंदी परिषद नवी दिल्ली यांच्या उपस्थितीत होणार आहे. सध्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान परंपरेच्या आधारे तयार करण्यात आलेले असल्याने महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या चर्चासत्रामध्ये परिसरातील बहुसंख्य हिंदी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे व संयोजक प्रो.(डॉ.) जिभाऊ मोरे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 7 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे