Breaking
ब्रेकिंग

कर्मयोगी सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या ग्रामीण स्वावलंबन पूर्तीचे स्वप्न साकार* केंद्रीय शिक्षण विभागीय एनबीए चे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयास तीन वर्षांसाठी मानांकन प्रदान –कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

0 0 5 1 3 2

कर्मयोगी सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या ग्रामीण स्वावलंबन पूर्तीचे स्वप्न साकार* केंद्रीय शिक्षण विभागीय एनबीए चे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयास तीन वर्षांसाठी मानांकन प्रदान –कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

अरुण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल/९०९६६६४५३३/ arun aher4321@gmail.com कोपरगांव* : कर्मयोगी सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या ग्रामीण स्वावलंबन पूर्तीसाठी अध्यक्ष नितीन कोल्हे व विश्वस्त अमित कोल्हे यांनी घेतलेल्या परिश्रमास भारत सरकारच्या शिक्षण  मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ   अक्रिडिटेशन  (एनबीए), नवी दिल्ली’ या स्वायत्त संस्थेने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी या विभागांचे  एनबीए-टीअर वनच्या आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) माणकांनुसार ( वाशिंग्टन  अॅकाॅर्ड )मुल्यांकन करून तीन वर्षांसाठी  नुकतेच मानांकन बहाल केले आहे. या अवघड व कठिण निकषांनुसार  मुल्यांकन करून घेणारे व एनबीए-टीअर वन मानांकन  प्राप्त करणारे संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज हे उत्तर महाराष्ट्र  व मराठवाड्याातील पहिले इंजिनिअरींग काॅलेज ठरले असुन या यशामुळे  संजीवनीच्या शिरपेचात अधिकचा एक कीर्तिमान स्थापित झाला आहे.

    या अभुतपूर्व यशाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे. तसेच संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांचे हस्ते व चिफ टेक्निकल ऑफिसर  श्री विजय नायडू यांचे उपस्थितीत गौरव सोहळा नुकताच युनिव्हर्सिटीच्या टेडेक्स हाॅल मध्ये संपन्न झाला. यावेळी डायरेक्टर डाॅ. आर. ए. कापगते, एनबीए संस्था समन्वयक डाॅ. जी. विजयकुमार, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. ए. एस. सय्यद, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. पी. एम. पटारे, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी विभाग प्रमुख डाॅ. एम.ए. जावळे, या तीनही विभागांचे एनबीए समन्वयक डाॅ. एस.व्ही. पाटणकर, डाॅ. एल. एस. धामंदे, प्रा. ए. ए. बारबिंड, डीन अकॅडमिक्स डाॅ. ए.बी. पवार, हेड ऑफ इन्स्टिटयूट  सर्विसेस श्री प्रकाश  जाधव, हेड ऑफ  अकॅडमिक गव्हर्नन्स डाॅ. आर. एस. शेंडगे  व रजिस्ट्रार प्रा. वाय. ए. पवार यांचा सत्कार करण्यात आला. सदर गौरव सोहळ्यास  इतर विभागांचे प्रमुख, डीन्स व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या  संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे