Breaking
ब्रेकिंग

महिला बचत गटांसाठी आर्थिक पर्वणी असलेल्या गोदाकाठ महोत्सवास ५ जानेवारीपासून प्रारंभ – सौ.पुष्पाताई काळे

0 0 1 7 5 0

 

महिला बचत गटांसाठी आर्थिक पर्वणी असलेल्या

गोदाकाठ महोत्सवास ५ जानेवारीपासून प्रारंभ – सौ.पुष्पाताई काळे

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगांव :–

बचत गटाच्या ग्रामीण व शहरी महिलांना आर्थिक ताकद देणाऱ्या व वर्षभर महिला बचत गट ज्या पर्वणीची आतुरतेने वाट पाहत असतात तो ‘गोदाकाठ महोत्सव’ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.०५) जानेवारी पासून मोठ्या उत्साहात सुरु होणार असल्याची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.      

 
 महिला बचत गटांना आर्थिक उत्पनाचे हक्काचे स्त्रोत निर्माण करून देणारा गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटांसाठी नेहमीच मोठी पर्वणी ठरत आला आहे.

दोन वर्ष संपूर्ण विश्वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे हा ‘गोदाकाठ महोत्सव’ होवू शकला नाही. परंतु मागील वर्षापासून ‘गोदाकाठ महोत्सव’ पुन्हा मोठ्या उत्साहात सुरु झाला आहे.

यावर्षी शुक्रवार (दि.०५) ते सोमवार (दि.०८) पर्यंत एकूण चार दिवस ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी दिली आहे.


महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देवून बचत गटांच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची जास्तीत जास्त विक्री होवून या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी उद्देशातून सुरु करण्यात आलेला गोदाकाठ महोत्सव जिल्ह्यासह राज्यपातळीवर पोहोचला आहे.

बचत गटाच्या महिलांची ‘हक्काची बाजारपेठ’ अशी वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यात ‘गोदाकाठ महोत्सवाची’ झालेली आहे. या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार 5 जानेवारीला होणार आहे

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 7 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे