Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र आणि एकूणच भारतभूमी ही संतांची भूमी आहे. संतांचे जीवन आणि काव्य आजही तितकेच प्रासंगिक आहे” – डॉ. मोहनराव देशमुख

0 0 3 9 5 5

महाराष्ट्र आणि एकूणच भारतभूमी ही संतांची भूमी आहे. संतांचे जीवन आणि काव्य आजही तितकेच प्रासंगिक आहे” – डॉ. मोहनराव देशमुख

कोपरगाव – 
“महाराष्ट्र आणि एकूणच भारतभूमी ही संतांची भूमी आहे. या मातीत अनेक संत-महात्मे होऊन गेले, ज्यांनी आपापल्या काळातील अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा तसेच विपरीत जीवन-व्यवहारावर परखड भाष्य करून समाज सुधारणेचा पाया रचला. या संतांचे जीवन आणि काव्य आजही तितकेच प्रासंगिक आहे” असे प्रतिपादन न्यू आर्ट्स महाविद्यालय अहिल्यानगर येथील माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. मोहनराव देशमुख यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या ‘संतांचे तत्त्वज्ञान आणि आपण’ या विषयावर आयोजित समारोपाच्या व्याख्यानसत्रात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. विजय ठाणगे म्हणाले की “बहि:शाल शिक्षण हा अत्यंत सुंदर उपक्रम असून त्याच्या माध्यमातून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक जीवनोपयोगी विषयांवर ही व्याख्याने आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.  यातून आपल्याला जीवनविषयक मार्गदर्शन प्राप्त होते.”


9 ते 13 जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या या व्याख्यानमालेची पहिली दोन पुष्पे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय, चासनळी ता. कोपरगाव येथे ‘भारतीय परंपरेतील विज्ञान’ व ‘आधुनिक शेती आणि युवक’ या विषयांवर क्रमशः प्रा. विजय सोनवणे व प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी गुंफली. या दोन व्याख्यानसत्रांच्या अध्यक्षस्थानी चासनळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. अमोल रणधीर होते.


‘भारतीय परंपरेतील विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. विजय सोनवणे म्हणाले की “भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील अनेक बाबी ह्या वरवर पाहता आपणास परंपरा वाटत 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 9 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे