श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने करण्यात आलेला शेतकरी दिन उपक्रम कौतुकास्पद – विजय बंब _
-
श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने करण्यात आलेला शेतकरी दिन उपक्रम कौतुकास्पद – विजय बंब _
कोपरगाव – येथील गोदाम गल्लीतील बंब प्लाझा येथे असणा-या श्री रेणुका माता मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन सोसायटीच्या वतीने शेतकरी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान समारंभ कौतुकास्पद असुन शेतकरयांना दिलासा देऊन आशावादी आहे म्हणून संस्थेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे विचार प्रगतशील शेतकरी, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब यांनी शेतकरी दिनानिमित्त व्यक्त केले.
आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे
भारतीय शेती हा पावसावरील जुगार आहे यंदा प्रचीती आली आहे पावसाळा समाधान कारक न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे जे काही पिकले ते नैसर्गिक आपत्तीत वा सुल्तानी आपत्तीत नुकसान झाले आहे
शेतकरी राजाला दिलासा देऊन ऊभारी मिळण्यासाठी संस्थेचे चेअरमन डॉ प्रशांत भालेराव यांच्या संकल्पनेतून शेतकरी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभ प्रसंगी अनेक शेतकरी सभासद उपस्थित होते
स्वागत व प्रास्ताविक कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक मयुर बोरावके यांनी केले प्रल्हाद वाघ यांनी संस्थेच्या उपक्रमांची,ठेविसंबंधी माहिती दिली
या प्रसंगी साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले समारंभ संपन्न करण्यासाठी कृष्णा चतुर, शुभांगी दिक्षित यांनी परिश्रम घेतले समारंभासाठी अविनाश पाटील, खांडेकर, भास्कर नरोडे, सौ. मंगल हेमचंद्र भवर, राजेंद्र भवर आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी विमा प्रतिनिधी कैलास पांडे हजर होते