के .जे. सोमय्या वरिष्ठ के . बी . कनिष्ठ महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदीकाव्य स्पर्धा करंडक पटकावला
के .जे. सोमय्या वरिष्ठ के . बी . कनिष्ठ महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदीकाव्य स्पर्धा करंडक पटकावला
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव :– के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समाधान वाव्हळ याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय स्वरचित हिंदी काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मानाचा करंडक प्राप्त केला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. बी एस यादव यांनी दिली.
डॉ. यादव पुढे म्हणाले की सा फु पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धा आधी जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात अहमदनगर जिल्ह्यातून हिंदी भाषेतून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या समाधान वाव्हळ व मेघा सोनवणे यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देतांना महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड म्हणाले कि, समाधान वाव्हळ याच्या या पुरस्कार प्राप्त कवितेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या स्मरणिकेत समावेश केला जाणार आहे व हि स्मरणिका पुणे विद्यापीठाच्या चारही जिल्ह्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
पुरस्कृत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुरगुरू मा. प्रो. सुरेश गोसावी यांनी पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये जिवंत कवी वसलेला आहे म्हणूनच इतक्या कमी वयात या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून समर्पक शब्दात मांडणी केली असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत. त्याच बरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक मा. प्रो. सदानंद भोसले यांनी समाधान वाव्हळ व सोमैया महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले आहे.
समाधान वाव्हळच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
समाधान वाव्हळ व मेघा सोनवणे यांना महाविद्यालयाचे वांग्मय मंडळाचे प्रमुख प्रो. जिभाऊ मोरे, डॉ. गणेश देशमुख, प्रो. संतोष पगारे, डॉ. संजय दवंगे, प्रो. संजय अरगडे, डॉ. रवींद्र जाधव, प्रा. सदाशिव नागरे, प्रा. वंदना घोरपडे आदींचे मार्गदर्शन लाभले.