Breaking
ब्रेकिंग

संजीवनी पाॅलीटेक्निक ‘सर्वोत्तम पाॅलीटेक्निक’ पुरस्कारने सन्मानित

0 0 1 3 2 4

संजीवनी पाॅलीटेक्निक ‘सर्वोत्तम पाॅलीटेक्निक’ पुरस्कारने सन्मानित


🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क ▪️ कोपरगाव :– राज्य स्तरीय विनाअनुदानित पॉलिटेक्निकच्या संघटनेकडून संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे के.बी. पी. पॉलिटेक्निकची राज्य व देश पातळीवरील गुणवत्ता व दर्जा, या संस्थेचे ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्य, अशा अनेक उपलब्धींची शहानिशा करून या संस्थेला असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंटस् ऑफ पाॅलीटेक्निक्स या राज्य स्तरीय संघटनेने ‘सर्वोत्तम पाॅलीटेक्निक’ या पुरस्कारने पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात गौरविले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी महसुल मंत्री श्री बाळासाहेब थोरात, प्रमुख पाहुणे व माजी गृह राज्य मंत्री श्री सतेज पाटील, चिपळुन विधान सभेचे आमदार श्री शेखर निकम व संघटनेचे अध्यक्ष श्री समिर वाघ यांचे हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी माजी सनदी अधिकारी श्री शेखर गायकवाड तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


असोसिएशनच्या वतीने राज्यातील सदस्य असलेल्या राज्यातील पाॅलीटेक्निक्स कॉलेजा कडून वेगवेगळ्या उपलब्धींचे पुराव्यासह या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जांची त्रिसदस्यीय समितीने छाननी करून प्राचार्यांचे सादरीकरण घेतले. यात प्राचार्य मिरीकर यांनी व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केलेल्या अनेक बाबींचे पुराव्यासह सादरीकरण दिले.

यात प्रामुख्याने सलग ९ वर्षे प्राप्त झालेले महत्वपुर्ण मानले जाणारे एनबीए हे सर्वोच्च मानांकन , एआयसीटीई, नवी दिल्ली कडून या पाॅलीटेक्निकला इतर पाॅलीटेक्निक्सला एनबीए मानांकन प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरीता २०२१ साली दिलेला भारतातील पहिल्या पाॅलीटेक्निकला ‘मेंटर इन्स्टिटयूट ’ चा दर्जा, राज्यात शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धांमधिल संपुर्ण राज्यामधुन प्राप्त केलेला दुसरा क्रमांक, तसेच संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकने २०२०-२१ या वर्षात आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांनी आयोजीत केलेल्या ‘क्लीन अँड स्मार्ट कॅम्पस’ स्पर्धेत सहभाग नोंदवुन देशात मिळविलेला दुसरा क्रमांक, अशा अनेक बाबींचे सादरीकरण दिले.

विशेष म्हणजे संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने दरवर्षी ग्रामीण विध्यार्थ्यांना त्यांच्या वयाच्या १९ व्या वर्षी मिळणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यामधिल नोकऱ्या ही बाब देखिल तितकीच महत्वपुर्ण ठरली.


अशा अनेक बाबींचा परीपाक म्हणुन संजीवनी पाॅलीटेक्निकला सर्वोत्तम पाॅलीटेक्निकचा बहुमान मिळुन आपले दर्जेदार आस्तित्व पुन्हा एकदा अधोरखित झाले.


पुरस्कार प्राप्त झाल्यावर अध्यक्ष श्री नितिन कोल्हे म्हणाले की संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे हे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी सुध्दा ४० वर्षांपूर्वी पाॅलीटेक्निक सुरू करू शकले असते, परंतु माझ्या शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं शिकून स्वावलंबी झाली पाहीजे, या हेतुने त्यांनी कोपरगांव सारख्या ग्रामीण भागात पाॅलीटेक्निक सुरू करून हजारो कुटूंबे उभी केली. त्यांनी घालुन दिलेल्या शैक्षणिक आचार संहितेनुसारच आजही कामकाज चालु असुन त्यामुळे वेगवेगळे कीर्तीमान स्थापित होत आहे.

संजीवनी पाॅलीटेक्निकला मिळालेला हा पुरस्कार सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या पवित्र स्मृतिस समर्पित करीत असल्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिक्रिया संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी व्यक्त केली.

▪️▪️▪️▪️▪️▪️

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 3 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे