आत्मा मालिक येथे भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे मल्लांची भरती
आग न्यूज पोर्टल नेटवर्क :
दर महिन्याच्या १ ल्या व ३ ऱ्या बुधवारी डॉ.पार्थ देवगावकर आत्मा मालिक हॉस्पिटल, नगर – मनमाड रोड, कोकमठाण ता.कोपरगांव येथे येत असतात….डॉ. पार्थ देवगावकर.(किडनी रोग) तज्ञ रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.. . तरी गरजू रुग्णांनी हॉस्पिटलला येऊन तपासणी करून घ्यावी अशी नम्र विनंती…….
संपर्क – 7304755655*
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क ९०९६६६४५३३
कोपरगाव : दिनांक २९ ते ३० एप्रिल २०२४ रोजी भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे.
भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून षासकीय कुस्ती कोच श्री.रुपेंदर पूनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत व निर्दशनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे.
आत्मा मालिक कुस्ती केंद्राला २००६ पासून साईची मान्यता आहे. आजपर्यंत आत्मा मालिकमधून ०४ विद्यार्थ्यानी आंतर राष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळविली आहेत. साई मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरीता वय वर्ष १० ते १६ वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे. निवड चाचणी प्रक्रियेतुन निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे प्रषिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे. असे आत्मा मालिक कुस्ती केंद्राने कळविले आहे