आ.आशुतोष काळेंची अहमदनगर व नासिक जिल्ह्यातील समन्यायी पाणी वाटपासाठी विधानसभेत लक्षवेधी
आ.आशुतोष काळेंची अहमदनगर व नासिक जिल्ह्यातील समन्यायी पाणी वाटपासाठी विधानसभेत लक्षवेधीl
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
*कोपरगांव :- सन २००५ साली अहमदनगर व नासिक जिल्ह्यातील हक्कांचे पाणी अन्यायी कायद्यानुसार जायकवाडीत सोडणेत आलें यामुळे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट कायम झाले याचा फटका पिण्याचे पाणी कृषी ,औद्योगिक व इतर विकासावर झाला वास्तविक पाहता या कायद्यात दर दहा वर्षांनी सर्वेक्षण करून आवश्यक तो बदल करण्याची तरतूद करण्यात आली परंतु या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी व लाभधारकांनी अनेक वर्षे मागणी करूनही यात कोणताही बदल झाला नाही
यासाठी सन 2023 च्या अधिवेशनात आमदार आशुतोष काळे यांनी लक्षवेधी सूचना दाखल केली आहे
चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती असतांनाही व कायम जायकवाडीत पुरेसे पाणी असतांनाच परत एकदा समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे नगर-नासिकच्या धरणातून खाली पाणी सोडण्यात आले.
त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून शासन कोणतेही असो गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्यायच होत आला आहे याकडे आ. आशुतोष काळे यांनी विधानसभेचे लक्ष वेधून समन्यायी पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात सोमवार (दि.१८) रोजी केली.
हिवाळी अधिवेशनात आ. आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे सभागृहाचे लक्ष वेधतांना त्यांनी सांगितले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघांतील गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड,सिन्नर, येवला आणि नगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर या तालुक्याच्या शेतकऱ्यांना मागील शंभरपेक्षा जास्त वर्षापासून गोदावरी कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी मिळते.
सुरुवातीला सिंचनासाठी बारमाही पद्धतीने पाणी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना ब्लॉक देण्यात आले. त्या नंतर या ब्लॉकच्या संख्येत कपात करून हे ब्लॉक पन्नास टक्के रद्द करण्यात आले आणि आता पूर्णपणे ब्लॉक नुतनीकरण करण्यासाठी थांबवले आहे.