Breaking
ब्रेकिंग

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलचे महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धेत दैदीप्यमान यश

0 0 4 5 0 5

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलचे महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धेत दैदीप्यमान यश

अरुण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल/9096664533/arun aher4321@gmail.com/arun aher0312@gmail.com

 कोपरगाव : शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये कोपरगाव तालुका पंचायत समिती, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बालचित्रकला स्पर्धा २०२५ मध्ये आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय व दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेतील एकूण १५ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात संस्थेची मान उंचावली आहे.

या स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कल्पकतेचा, सर्जनशीलतेचा व कलागुणांचा प्रत्यय दिला. विद्यार्थ्यांच्या चित्रांमधून सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक मूल्ये व सर्जनशील दृष्टिकोन प्रभावीपणे व्यक्त झाल्याने परीक्षकांनी त्यांची विशेष दखल घेतली.

गटनिहाय निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गट १ ला (इ.१ ली ते २ री) या गटातून अनुज डोंगरे, अंकिता पावरा, मनस्वी आगळे व मानसी पडोळे; गट २ रा (इयत्ता ३ री ते ४ थी) या गटातून श्रेया हरळे, स्वरा बिडवे, अर्णव भागवत, शारदा पावरा, संस्कार पर्वत व श्रद्धा टिळेकर; गट ३ रा (इ.५ वी ते ७ वी) या गटातून युवराज शिंदे व आराध्या लोंढे; तर गट ४ था (इ. ८ वी ते १० वी) या गटातून रितिका होंड, सिद्धी सरोदे व अजय पावरा यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या चित्रांची पुढील जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे चित्रकला शिक्षकांचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण परिश्रम मोलाचे ठरले. ज्ञानेश्वर पर्वत, गोकुळ गायकवाड, निलेश सावंत, स्वप्निल पाटील, संदीप धनवटे, सोनाली ठाकूर व राहुल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या घवघवीत यशाबद्दल सद्गुरु आत्मा मालिक माऊली यांच्या कृपाशीर्वादासह संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी, व्यवस्थापक सुधाकर मलिक,साईनाथ वर्पे, मीरा पटेल, प्राचार्य माणिक जाधव, मीनाक्षी काकडे, नितीन सोनवणे तसेच सर्व विभागप्रमुखांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 5 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे