वकृत्व स्पर्धेतून सफल जीवनाचे सार्थक घडते —कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे
वकृत्व स्पर्धेतून सफल जीवनाचे सार्थक घडते —कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :–
मानव आयुष्यभर विद्यार्थीअसतो . परंतु याच बळावर मानव विकास घडत असल्याने
समयसुचकता, आकर्षक देहबोली, दिलखेचक सरळ ओघवत्या भाषेत कमीत कमी शब्दांत मांडणी,निडरपणा ह्यांचे संस्कार वकृत्व स्पर्धेतून घडतात. या संस्कारातूनच मानवी नेतृत्व जन्माला येते
या स्पर्धेकरिता निवडलेले विषय अन्याय ग्रस्त व वंचित जनमानसांच्या समस्यांना वाचा फोडून त्यावरील विचार मंथनातून सोडवणूकीचे प्रेरणादायी मार्गदर्शन मिळणार असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी काढले. .
कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मा.श्री. अमोल बागुल ह्यांचे शुभ हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी भुषविले तर सचिव मा.ॲड संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, मा. सुधीर डागा, मा. ॲड. संजय भोकरे, प्रा.आवारे, परीक्षक प्रा.लक्ष्मण महाडिक, डॉ.बाबासाहेब शेंडगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन सत्रात मा. अमोल बागुल यांनी ह्या स्पर्धेचे आयोजक रोहमारे परिवाराचा गौरव करतांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात समर्पित असलेले हे कुटुंब कोपरगावची आई म्हणून काम करत असल्याचे म्हटले. वक्तृत्व स्पर्धेबद्दल बोलतांना वक्तृत्व हे केवळ भौतिक गोष्टी मिळविण्यासाठी नसून अशा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारांचे जन-जागरण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात व्यापक माणुसकीचा उल्लेख करतानांच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत करतांनाच वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कौशल्य विकसित व्हावे व यातून सामाजिक परिवर्तनाचे काम विद्यार्थ्यांच्या हातून घडावे अशी मनोकामना व्यक्त केली.
. या स्पर्धेसाठी मुंबई , कोल्हापूर , पुणे, नंदुरबार, धुळे, अहमनगर, नाशिक, छ. संभाजीनगर आदी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील एकूण ४५ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये मानाचा के.बी.रोहमारे स्मृति करंडक सांघिक प्रथम क्रमांक न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर या संघाने पटकावला. या महाविद्यालयाच्या महेश जनार्दन उशिर व आकाश मोहिते यांनी सर्वाधिक गुण मिळवून सन्मानचिन्ह, रूपये २१००/ सह करंडक पटकावला. वैयक्तिक प्रथम क्रमांक रूपये ९०००/ यश रविंद्र पाटील (बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण), वैयक्तिक व्दितीय क्रमांक रूपये ७०००/ पराग राजेंद्र बदिरके ( यशवंतराव चव्हाण शासकिय विधी महाविद्यालय, पुणे), वैयक्तिक तृतीय क्रमांक रूपये ५०००/ महेश जनार्दन उशिर यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी रूपये १०००/ आकाश मोहिते ( न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर), साक्षी सुनील सवई (एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव) यांनी पटकावले. या स्पर्धेमध्ये ज्येष्ठ मराठी कवी प्रा.लक्ष्मण महाडिक, डॉ. बाबासाहेब शेंडगे व प्रा.संपत आहेर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक प्रो. जे. एस. मोरे यांनी करतांना या स्पर्धेची पार्श्वभूमी व हेतू कथन केला. सूत्रसंचालन डॉ. एस. के. बनसोडे यांनी तर आभार महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. सुधीर डागा यांनी मानले.
या स्पर्धेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. विजय ठाणगे, संयोजन समितीचे सदस्य डॉ. गणेश देशमुख, प्रो. संतोष पगारे, प्रो. बी.बी.भोसले, डॉ. रविंद्र जाधव, डॉ. संजय दवंगे, प्रो. एस.एल. अरगडे, डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. एन. टी. ढोकळे, प्रा. किरण सोळसे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेतील स्पर्धकांना ऐकण्यासाठी आयोजक महाविद्यालयासह इतर महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.