Breaking
ब्रेकिंग

जे पवार साहेबांचे नाही झाले ते कोपरगावचे काय होणार ? – दिपक साळुंके

0 0 1 9 4 9

जे पवार साहेबांचे नाही झाले ते कोपरगावचे काय होणार ? – दिपक साळुंके

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव ,:– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या १२ डिसेंबर रोजी वाढदिवस झाला.कोपरगाव मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी एकही फलक शुभेच्छा देणारा लावला नाही.प्रसिध्दीसाठी आणि मतांसाठी पवार साहेब आणि स्वार्थ दिसताच सोयीस्कर भूमिका घेण्याची काळे यांची निती शरद पवार यांच्या विचारांच्या अनेकांना दुखावणारी होती अशी टीका शरद पवार गटाचे राष्ट्रवादी माजी उपजिल्हाध्यक्ष दिपक साळुंके यांनी केली आहे.

शरद पवार यांनी कोपरगाव येथे २०१९. निवडणुकीत सभा घेतली आणि आशुतोष काळे यांच्या विजयाची हमी घेतली होती.सत्तेत आल्यावर काळे यांना साई बाबा संस्थान अध्यक्षपद आणि रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग चेअरमन केले.

संधी देऊन मोठे ज्या शरद पवार यांनी केले त्यांचा वाढदिवस काळे यांना सहजगत्या एकही फलक न लावता विसरता आले हे वेळ पाहून राजकीय भूमिका घेण्याची काळे यांची निती असल्याची भावना जनमानसात झाली आहे.

राजकारण हे नीतिमत्ता जपून करावे मात्र केवळ सत्तेची संधी हवी म्हणून ज्यांनी डोक्यावर वरदहस्त ठेवला म्हणून आपण विजयी झालो होतो हे विसरने हे दुर्दैव आहे.काळे यांनी नेहमी सत्तेसाठी पर्यटन म्हणून विविध पक्षाची भटकंती केलेली आहे

अतिशय मोठ्या संधी देऊनही जे शरद पवार यांना विसरले अशा काळे यांना इतर कार्यक्रमात पवारांचा फोटो वापरण्याचा नैतिक अधिकार नाही.संधी साधू राजकारण करने हा प्रकार काळे यांनी थांबवावा कारण जनतेला सर्व लक्षात आले आहे.ज्या पवार साहेबांनी संधी देऊन मोठे केले त्यांचे काळे झाले नाही तर ते जनतेचे काय होणार असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही असे शेवटी साळुंके म्हणाले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे