के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राज्य वक्तृत्व स्पर्धेत यश
के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राज्य वक्तृत्व स्पर्धेत यश
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव. :– अँड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर ता.अकोले यांच्या वतीने कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी स्मृती चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयीन अकरावी कला शाखेची विद्यार्थिनी कु. त्रिभुवन स्नेहल बापू हिने तृतीय क्रमांक (रोख रक्कम प्रमाणपत्र), अकरावी कला शाखेतील विद्यार्थी निंबाळकर रामेश्वर ज्ञानेश्वर याने उत्तेजनार्थ ( रोख रक्कम , प्रमाणपत्र) तसेच सांघिक राज्यस्तरीय फिरता स्मृती चषक पटकावला.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव अँड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त श्री. संदीप रोहमारे, श्री.सुजित रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा . सूर्यवंशी ए. एफ., प्रा. बुधवंत डी. एस., प्रा. जाधव डी.जे., प्रा. भोंडवे जे. आर., प्रा. मोरे बी.व्ही. यांचे मार्गदर्शन लाभले.