एस. एस. जी. एम. कॉलेज मध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध उपक्रमांनी संपन्न..
संपादक अरुण आहेर
एस. एस. जी. एम. कॉलेज मध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध उपक्रमांनी संपन्न..
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव – येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये मराठी विभागाद्वारे आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या भाषा पंधरवड्याची सुरुवात गुगल फॉर्मद्वारे प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन करण्यात आली. त्यानंतर काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, सुंदर, सुवाच्य हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदविला.
सदर भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. संतोष तांदळे यांच्या व्याख्यानपर कार्यक्रमाने झाला. श्री. संतोष तांदळे यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला ओळखून त्या जोपासाव्या. दुसऱ्यांचे रिल्स बघण्यापेक्षा स्वतःचे रिल्स, प्रतिमा तयार कराव्या. काम बंद करण्यापेक्षा कामात बदल करून व्यक्तिमत्व विकास करावा. जोपर्यंत, ज्ञानोबा, तुकोबांचे अभंग वाजत राहतील. तोपर्यंत मराठी गाजत राहील. या मराठीची जाणीव जागती ठेवावी. आपल्या मेंदूची मेमरी वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान मिळवून भरावी. अशा स्वरूपाचे विचार मांडून मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ विभागातील प्रा.विजय रोहम यांनी भूषविले. त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सांगितले की, फुकट काही मिळत नाही आणि कष्ट वाया जात नाहीत. अध्यात्माचा स्पर्श व्यक्तीला अत्युच्च स्थानी नेतो. त्यामुळे वर्तमानाशी संत साहित्याची सांगड घालून मराठीचा डंका गाजवत ठेवण्याबरोबरच स्वतःचाही व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांनी साधावा.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करून मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. उज्ज्वला भोर यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यामागील भूमिका व मराठी भाषकांची जबाबदारी स्पष्ट केली.प्रा.डॉ. बी. आर. शेंडगे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.झाल्टे कविता, देवरे हिमानी, घुमरे चेतना, पिंपळे धनश्री, थोरात वैष्णवी, बावधने पायल, खटकाळे कल्याणी, कदम गणेश, थोरात स्वप्निल, वायदेशकर नेहा, घुगे गायत्री, माळोदे वैष्णवी, थोरात ऋतुजा, विकी पगारे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपल्या कविता वाचून उपस्थितांना प्रभावित केले; तर स्वप्निल थोरात याने गायलेल्या अभंगाने सर्वच श्रोते मंत्रमुग्ध झाले.
सदर कार्यक्रमासाठी डॉ. सुरेश काळे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच प्रा. सुनीता अंत्रे, प्रा. चव्हाण, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली सुपेकर, डॉ.सुनील काकडे, प्रा.रावसाहेब दहे, प्रा.सौ.जयश्री शेंडगे, प्रा. सौ. देशमुख, प्रा.रोहिणी डिबरे इ.सह अनेक प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार प्रा.रावसाहेब दहे यांनी व्यक्त केले. प्रा.भागवत देवकाते यांनी सूत्रसंचालन केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी, ,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. जी. एम. कॉलेज मध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध उपक्रमांनी संपन्न.