कारभारी भिमाजी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीतील ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत विविध उपक्रम यशस्वीरित्या संपन्न
संपादक - अरुण आहेर
कारभारी भिमाजी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीतील ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत विविध उपक्रम यशस्वीरित्या संपन्न
🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगांव – येथील कारभारी भिमाजी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने,घरघर तिरंगा अभियान, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हास, , तिरंगा प्रतिज्ञा अभियान आणि तिरंगी सेल्पीसह माजी सैनिकांचा यथोचित सन्मान आदी यशस्वी उपक्रम राबविण्यात आले.
तसेच 14 ऑगस्ट ला प्रमुख पाहुणे कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री युवराज गांगवे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी.बी.भोसले यांच्याअध्यक्षतेखाली तसेच महाविद्यालयाचे सन्माननीय रजिस्टार डॉक्टर ए.सी.नाईकवाडे , माजी सैनिक श्री जालिंदर जगताप , श्री सचिन शेळके, श्री सागर शेंडगे, श्री गणेश रक्ताटे, श्री मच्छिंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी उपस्थित मान्यवर माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.रजिस्ट्रार डॉ. ए . सी. नाईकवाडे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री युवराज गांगवे यांनी सैनिकांचे जीवन व प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत करून आपले ध्येय साध्य करावे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय श्री सोनवणे बी.आर, श्री जगझाप एस.बी., श्री होन बी. डी. व इतर शिक्षक रुंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भोंडवे जे.आर. व आभार प्रा. जेजुरकर जी.ए. यांनी केले.
हर घर तिरंगा अभियानासाठी महाविद्यालयातील प्रा. जाधव डी.जे.प्रा. बुधवंत डी. एस., प्रा. वाघ ए.जी., क्रीडा शिक्षक कांबळे एम. व्ही. व इतर शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले व हर घर तिरंगा अभियान महाविद्यालयात यशस्वीपणे संपन्न झाले.