Breaking
ब्रेकिंग

एशियन कॉन्फडरेशनऑफ क्रेडीट युनियन ( ॲक्यू) चे कोषाध्यक्ष व समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली समता पतसंस्था व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांनी महाराष्ट्रात प्रदुषण मुक्तीसाठी कंबर कसली

0 0 1 7 5 0

एशियन कॉन्फडरेशनऑफ क्रेडीट युनियन ( ॲक्यू) चे कोषाध्यक्ष व समता पतसंस्थेचे अध्यक्ष  ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली समता पतसंस्था व महाराष्ट्र राज्य पतसंस्था  फेडरेशन यांनी महाराष्ट्रात प्रदुषण मुक्तीसाठी कंबर कसली

 कोपरगाव :- महाराष्ट्रात गत वर्षापासून सर्वप्रथम समता पतसंस्थेने पेपरलेस व्यवस्थापन पध्दतीचा वापर करून  महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन माध्यमातून  सर्व पतसंस्थामध्ये ही प्रणालीवापर सुरू करण्याचा  संकल्प सोडला असून त्याची बऱ्याच पतसंस्थामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे .यामुळे शेकडो पतसंस्थांची लाखो रुपयांची,पाणी, वेळ मानवी बळामध्ये बचत होत आहे.एशियन कॉन्फडरेशनऑफ क्रेडीट युनियनचे कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष, आणि समता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन संचालिका ॲड.सौ अंजली पाटील यांनी या  यशस्वी मोहिमेचे सचित्र माहितीसह गत आठवड्यात  नेपाळ मधील काठमांडू येथे पार पडलेल्या आशिया खंडातील पतसंस्था फेडरेशन ऑफ युनियन च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय क्रेडिट कौन्सिल अध्यक्षा आणि सीईओ एलिसा मक्कार्टर  (अमेरीका),  एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन अध्यक्ष योनसिक किम(थायलंड  ) चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इलेनिटा सन रोक्यू,नेपाळ संसद अध्यक्षांसह तसेच आशिया खंडातील २६ देशातील विविध स्तरांवरील ४६३ पतसंस्था फेडरेशन, विविध देशांतील प्रख्यात अर्थ तज्ञांचे उपस्थितीमध्ये पेपरलेस कामकाज व्यवस्थापन पध्दतीचे सचित्र सादरीकरण केले . यानंतर सर्व उपस्थितांनी उभे राहून दोन्ही भारतीय प्रतिनिधींचेवर गौरवास्पद अभिनंदन वर्षाव व टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करतांना या पेपर लेस पध्दतींची तातडीने  आमच्या संस्थांमध्ये अंमलबजावणी करू अशी ठाम ग्वाही एकत्रितपणे व वयैक्तिक भेटीत दिली.

 

या दरम्यान यशस्वी पेपरलेस मोहिमेबरोबर सन २०२३मधील गणेश उत्सवात पावन गोमातेचे गो्मूत्र आणि गोबर (शेण ) यापासून संवत्सर (ता. कोपरगाव) येथील आबक बंधू प्रदुषण मुक्त श्रीगणेश मुर्ती बनवित असल्याची माहिती समता पतसंस्थेचे युवा  संचालक संदीप कोयटे व कांतीलाल जोशी यांना कळताच त्यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य गोसंरक्षक आयोग अथ्यक्ष शेखर मुंदडा यांच्या शुभहस्ते आबक बंधूंचा समता पतसंस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करून हजारो श्रीगणेश मुर्ती बनविण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना सर्व प्रकारच्या मदती सह शेकडो *गणेश मुर्ती उत्पादन  व विक्रीसाठी सहभाग नोंदवून प्रत्यक्षात समता पतसंस्थेने रोजगार पुरविला. .या अद्वितीय कामगिरीमुळे देशातील सर्व धर्मीयांनी भावी काळात आप आपल्या वेगवेगळ्या धार्मिक विधी व उत्सवात गोमातेच्या पवित्र गोमुत्र आणि गोबर ( शेण ) यापासून ईश्वर मुर्तींची निर्मिती व स्थापना करुन कार्यक्रम समाप्तीनंतर सन्मानपूर्वक विसर्जन करावे. यामुळे  देशातील सर्व नद्या, ओढे , पाणवठे अथवा घरात पाण्याच्या बादल्या, भांडी, टाक्यात विसर्जन केल्यावर हे  हे प्रदुषणमुक्त व आरोग्यदायी पाणी आपल्या परिसरातील वृक्षवाढ आणि प्रदुषणमुक्त जमिनीत वापरावे. यामुळे सध्या विविध प्रकारच्या *प्राणघातक रंग व साहित्य वापराला प्रतिबंध होणार असतांनाच घराजवळच मुबलक कच्चा माल मिळाल्याने अत्यंत कमी खर्चात,* *श्रमात ,वेळेत या ईश्वर मुर्तीं स्थानिक पातळीवर सहज उपल्ब्ध होऊन देशातील* *प्राणघातक कार्बन व दुषित केमिकल पाणी प्रदुषणमुक्त आणि जमीन प्रदुषणमुक्ती साठी* *हातभार लागणार आहे. यांचा फायदा जागतिक उद्योग , प्रगत देशपातळीवरीलप्रदुषण*  *मुक्तीसाठी दिल्या जाणारे कार्बन* *क्रेडिट रुपात अब्जावधी डॉलर आपल्या देशाचे तिजोरीत* *येवून ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याने  सर्व नागरिक , उद्योग,केंद्र व सर्व राज्य सरकारांनी प्राधान्य हक्कानेआपल्या प्रत्येक कामकाजात पेपर लेस पध्दतींचा व आपल्या सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात गोमातेच्या गोमुत्र आणि गोबर ( शेण ) यांपासून बनवलेल्या . मुर्ती ,,प्रतिमा आणि साहित्य वापर करावा असे आवाहन  समता पत संस्था अध्यक्ष* *ओमप्रकाश कोयटे यांनी केले या यशस्वी मोहिमेचा प्रारंभ समता पतसंस्थेच्या मुख्य* *कार्यालयात पवित्र गोमूत्र व गोबर पासून बनवलेल्या श्रीगणेशाची* *स्थापना संस्थेचे    महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व समता पतस़ंस्था संस्थापक* *अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे , जेष्ठ  संचालक कांतीलाल जोशी ,मुख्य कार्यकारी व्यवस्थापक सचिन भट्टड , हर्षल जोशी आदिंच्या प्रमुख उपस्थितीत,श्री.किरण* *व सौ.रोहिणी शिरोडे दापंत्यांचे शुभ हस्ते करण्यात आली.याप्रसंगी संचालक , सर्व शाखा  व्यवस्थापक व्यवस्थापक,सभासद उपस्थित होते. याशिवाय श्रीगणेशाची आरती रोज दोन वेळा*  *संचालक,सभासद दापंत्यांचे हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, प्रमुख उपस्थितीतांचे स्वागत, आभार मुख्य शाखा व्यवस्थापक योगेश मोरे यांनी मानले.

 

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 7 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे