Breaking
ब्रेकिंग

ओम प्रकाश कोयटे यांनी महाराष्ट्र राज्यातील सहकारी पतसंस्था फेडरेशन व विविध उद्योग निर्मिती व संघटन उभारणीतून स्थानिक जनतेला रोजगार हमी मिळवून दिली – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

0 0 1 1 5 9

ओम प्रकाश कोयटे यांनी महाराष्ट्र राज्यातील सहकारी पतसंस्था फेडरेशन व विविध उद्योग निर्मिती व संघटन उभारणीतून स्थानिक जनतेला रोजगार हमी मिळवून दिली – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव : — दैशात पतसंस्था चळवळीला योग्य दिशा देण्याचे काम काका कोयटे करत असतांनाच त्यांनी महाराष्ट्रात पतसंस्था चळवळ वाढविण्यास व मजबूत करण्यास सर्वस्व पणाला लावले त्यांच्या जिद्दी कर्तृत्वाने कोपरगाव तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकवले आहे. याची दखल जागतिक पातळीवरील विविध प्रगत देशांनी घेतली असल्याने जागतिक पतसंस्था फेडरेशन चे नेतृत्व ओमप्रकाश कोयटे रुपाने कोपरगावकरांच्या पदरात पडले तर आश्चर्य वाटायला नको. त्यांचे नेतृत्व कल्पक असल्याने त्यांनी अर्धवट शिक्षण सोडल्यावर आपल्या सहकाऱ्यांना संघटीत करून अनेक रोजगार निर्मितीतून यशस्वी उद्योजक घडविले . त्याचा प्रत्यय राज्यात ,कोपरगाव शहरातील विविध व्यापारी व किराणा मर्चंट संघटना मधील सदस्यांचे आर्थिक व्यवस्थापनात दिसून येतो .


यावर कळस म्हणजे सर्वत्र सोने तारण कर्ज योजना बदनाम ह़ोत असतांनाच ओमप्रकाश कोयटे यांचे देखरेखीखालील सुधन योजना महाराष्ट्रात १००० कोटी रुपयांच्या उलाढाली कडील वाटचालीत झेप घेत आहेत याबद्दल संदीप कोयटे यांचे अभिनंदन
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या परिसरातील ६५ वर्षावरील वृध्द, मतिमंद, अनाथांना कोरोना साथीत व याकाळापासून अखंड दोन वेळ घरपोच भोजन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. समता शैक्षणिक समूहाचे विद्द्यार्थ्यी उच्च अत्याधुनिक तंत्रज्ञान व विकसित शिक्षण घेण्याबरोबरच देश आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धात जगाचे नकाशावर समताचे नाव झळकवण्यात अग्रेसर आहेत.


स्थानिक जनतेला विश्वासार्ह रोजगार निर्मिती करणारा समता पॅटर्न तुमच्या – आमच्यासाठी एकमेव पर्याय ठरतोय असे गौरवोद्गार काढले.
या कोपरगाव परिसरातील आमदार आशुतोष काळे यांनी अवघ्या चार वर्षांत कोपरगाव शहराला रोज पाणी मिळवून देण्यासाठी हाती घेतलेले चौथ्या जल साठवण तलावाचे काम, नविन औद्योगिक वसाहतीसाठी केलेला पाठपुरावा, तालुक्यातील रस्ते, विविध शासकीय कार्यालये उभारणी, कोरोना काळातील उपचार , ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीत आधुनिककरणासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यात शासकीय मोफतआरोग्य केंद्र निर्मिती आदी माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी जनतेला उपलब्ध करून दिला. तसेच आपल्या पाठीशी युवक महिला, विविध संघटना, उद्द्योजक नेते ,कार्यकर्त्यांत आदराची विश्वासार्हता मिळवली आहे.

कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थात आघाडी मिळवून आमदार आशुतोष काळे हे ट्रीपल इंजिन सरकारचे घटक आहेत याशिवाय ज्या पक्षाचा सत्ताधारी आमदार त्यालाच उमेदवारी या सुत्रांनुसार आमदार आशुतोष काळे हेच आमचें उमेदवार , अशा परिस्थितीत आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीशी मी स्वबळानिशी खंबीरपणे उभा रहाणार असल्याची ठाम ग्वाही नाम. राधाकृष्ण विखे यांनी दिली.


कोपरगाव तालुक्यातील डॉ. रामदास आव्हाड यांनी अनेक वर्षांपासून आयुर्वेद क्षेत्रात केवळ देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर विविध पुरस्कार मिळविले. एवढ्यावर न थांबता आयुर्वेद क्षेत्रात कर्तृत्ववान डॉक्टर घडविण्यात त्यांचा हातखंडा आहे. हे करत असतानाच श्रीसाई रुग्णालयात देशभरात़ून येणाऱ्या रुग्णांवर ते अविरत अत्याधुनिक आयुर्वेद उपचार करतात

याचबरोबर ग्रामीण भागातील गायनात निरक्षर असलेल्या गौरी पगारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वबळावर अल्पवयात झी. टी.व्ही ची लिटल चॅम्प्स विजेती ठरली हे भुषणावह आहे. यापुढील काळात तिच्या शिक्षणासह सर्व जबाबदारी प्रवरा उद्योग समूहाने घेतल्याचे जाहीर केले.

शहरातील प्रभाग २ मधील उपनगरांचा माजी नगरसेवक जनार्दन कदम व नगरसेविका सौ.दिपा गिरमे यांच्याद्वारा विकास साधला आहे. असाच हातभार कोपरगाव तालुक्याच्या विकासाला लावावा.असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखे यांनी केले.
प्रभाग २ मधील विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा. यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि अहमदनगर जिल्हा पालकमंत्री मा.श्री.राधाकृष्ण विखे यांचेकडे पाठपुरावा करून मा.विखे यांनी त्यांची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत नागरी दलीतेत्तर वस्ती सुधारणा योजना अंतर्गत १ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता.
त्या निधी अंतर्गत सुभद्रानगर भागातील पेव्हींग ब्लॉक बसविणे, जानकी विश्व भागातील रस्त्याचे डांबरीकरण करणे, डॉ.भांडगे घर ते संजीवनी जन.स्टोअर्स रस्त्याचे डांबरीकरण, साईडपटटीस पेव्हींग ब्लॉक बसविणे, येवला रस्ता ते स्वामी रंग अपार्टमेंट ते सरोदे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणे करणे, कांगुणे घर ते निवारा ट्रेडर्स पर्यंत भुयारी गटार बांधकाम करणे आदी कामांचे भूमिपुजन करण्यात आले.
तसेच कोपरगाव व राहाता तालुक्यातील एम.आय.डी.सी अनुदान दिल्याबद्दल मा.राधाकृष्ण विखे यांचा जाहीर सत्कार व श्री.राजेश परजणे यांची राष्ट्रीय डेअरी विकास (एनडीडीबी) या संस्थेच्या संचालकपदी निवड, डॉ.रामदास आव्हाड यांना भारत सरकारच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि झी मराठी वाहिनी सारेगमप लिटल चॅम्प २०२३ ची महाविजेती गौरी अलका पगारे यांचा सन्मान सोहळा प्रभाग २ मधील जानकी विश्व कॉलनीत संपन्न झाला. त्या वेळीनाम. राधाकृष्ण विखे बोलत होते.

प्रास्तविकात मनोगत व्यक्त करताना ओमप्रकाश कोयटे म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मा.राधाकृष्ण विखे यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहेत. त्यांच्या मते माध्यमातून प्रभाग २ साठी निधी मिळाल्यामुळे या भागातील विकास करता येत आहे. राहाता व कोपरगाव तालुक्यात एमआयडीसी मंजूर केली असून तालुक्यासाठी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला तर कोपरगाव तालुक्यात विकासाची गंगा निश्चित वाहील.अशी ठाम ग्वाही दिली
याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगांव तालुक्यातील विकासासाठी आपण जिद्दीने सर्वस्व पणाला लावत असून या कार्यात अडथळे येवून विलंब लागू नये याकरिता कोणी निंदो कोणी वंदो कोणत्याही न केलेल्या कार्याचे श्रेय फलकबाजी करो हे मी कायम दुर्लक्षित केल्यानेच मी तालुका विकास कामात यशस्वीठरलो.व ठरणार आहे . याचमुळे मला सर्वत्र पाठिंबा मिळत असल्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. म्हणून ट्रीपल इंजिन युतीत आगामी निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत आपली उमेदवारी निश्चित असल्याचा ठाम आत्मविश्वास आमदार आशुतोष काळे यांनी कार्यक्रमाचे समारोपात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ व समीर आत्तार यांनी केले.
याप्रसंगी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख (शहरी), वासुदेव देसले (ग्रामीण), महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम बागरेचा, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजप नेते रविंद्र बोरावके, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, अजित लोहाडे, जेष्ठ उद्योगपती कैलासचंद्र ठोळे, जेष्ठ नागरिक मंच अध्यक्षा सौ.सुधाभाभी ठोळे, सचिव विजय बंब, बालरोग तज्ज्ञ डॉ.अजय गर्जे, मनोज अग्रवाल, दिपकजी विसपुते, उत्तमभाई शहा, राजेंद्र शिरोडे, तुलसीदास खुबाणी, आशुतोष पटवर्धन, भरत मोरे, मुन्ना मन्सूरी, अस्लम शेख, अमित लोहाडे, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष सुमित भट्टड, रामदास थोरे, सिद्धेश कपिले, प्रदीप साखरे, डॉ.विलास आचारी, अरविंदशेठ भन्साळी, चंद्रकांत नागरे, गुलशन होडे, अरविंद पटेल, शिवकुमार सोनेकर, राजेंद्र शिंगी, दिपक अग्रवाल, किरण शिरोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, मंदार पहाडे, विनायक गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार देविदास झाल्टे यांनी मानले.

 शिर्डी जिल्हा करून त्याला साईनगर असे नाव देऊन महापालिका जाहीर करावी. या महानगरपालिकेत कोपरगाव, शिर्डी, राहाता यांचा समावेश करून कोपरगाव तालुक्याच्या विकासाच्या वाटा खुल्या करून द्याव्यात.अशी मागणी काका कोयटे यांनी मंत्री महोदयांकडे केली असता उपस्थितांनी हात वर करत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
जानकी विश्व – २ परिसरातील नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या, घरावर गुढ्या उभारून, फुले उधळत मा.राधाकृष्ण विखे यांचे स्वागत केले. तसेच शहर व उपनगरातील प्रलंबित विकास कामासंदर्भात मा.मंत्री महोदय यांना निवेदने देण्यात आली.या नियोजनबद्ध पद्धतीने कौतुकास्पद व्यवस्थापन केल्याबद्दल माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचें उपस्थितांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे अतिशय आखीव, रेखीव, सुरेख नियोजन माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी केले. मा.मंत्री महोदयांवर फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी अशा अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे