कोपरगाव तालुक्याचा विकास खराब रस्त्यामुळे खुंटला — भाजप युवा नेते विवेक कोल्हे

कोपरगाव तालुक्याचा विकास खराब रस्त्यामुळे खुंटला — भाजप युवा नेते विवेक कोल्हे
कोपरगाव — कोपरगाव तालुक्यातील खराब रस्त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून खुंटला असल्याची जळजळीत खंत भाजप युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या 65 व्या वार्षिक सभेत चेअरमनपदावरुन बोलताना व्यक्त केली. प्रारंभी मागील वर्षाचे इतिवृत्ते वाचून कायम करण्यात आली. तसेच चालू आर्थिक वर्षातील महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले आणि पुढील विकासासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
कोपरगाव औद्योगिक वसाहतीचा विकास अनंत अडचणी असतांना झपाट्याने सुरू असून वसाहतीतील अंतर्गत रस्ते, कारखानदारांना मिळणाऱ्या सुविधा आणि वैशिष्ट्यपूर्ण धोरणांची अंमलबजावणी यामुळे उद्योग वसाहत अधिक सक्षम बनत असल्याने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या सभेत विशेष सन्मान करण्यात आला.या वेळी पल्लवी गोरक्षनाथ खळेकर यांना नवउद्योजक पुरस्कार, वंदना शरद पाटोळे यांना आदर्श उद्योजक पुरस्कार तर साईनाथ रंगनाथ राहणे यांना कोपरगाव तालुक्यातील नवउद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले की, वसाहतीमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा व आवश्यक ती विकासकामे करण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे.
कारखानदार व गाळाधारक यांचे हित जपण्यासाठी सकारात्मक निर्णय विविध पातळ्यांवर घेतले जातील. औद्योगिक वसाहत ही केवळ कारखानदारांसाठी नाही तर संपूर्ण तालुक्याच्या आर्थिक प्रगतीचे केंद्रबिंदू आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या वार्षिक सभेला सर्व संचालक मंडळ सदस्य, कारखानदार, गाळाधारक व मान्यवर उपस्थित होते. सभेच्या यशस्वी आयोजनामुळे कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या विकासाला नवे बळ मिळाले असून पुढील काळातही वसाहतीचा सर्वांगीण विकास वेगाने होत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
जवळके येथील नवउद्योजक साईनाथ राहणे यांनी आमच्या गावाकडे बस येण्यासारखी सुद्धा परिस्थिती नाही व बस देखील येत नाही अशी खंत व्यक्त केली.यावरून त्या भागातील रस्त्यांचा प्रश्न किती ऐरणीवर आहे हे समोर आले. मात्र दुसरीकडे विवेकभैय्या कोल्हे यांच्यामुळे औद्योगीक वसाहतीमध्ये अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत याचा आनंद वाटतो. यावर प्रतिक्रिया देताना विवेकभैय्या कोल्हे यांनी तालुक्यातील रस्त्याची समस्या किती गंभीर आहे त्याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे कारण उद्योजकांना चांगले रस्ते मिळाले तर व्यवसायाला गती निर्माण होऊ शकते याकडे लक्ष वेधले व बस आगारात लोकसंख्येच्या तुलनेत बस संख्या कमी पडण्यावर भाष्य केले.
यासभेसाठी उपाध्यक्ष केशवराव भवर व सर्व संचालक मंडळ,गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे,
कोल्हे कारखाना संचालक ज्ञानेश्वर परजणे, माजी संचालक गुलाबराव वरकड,बाळासाहेब शेटे, औद्योगिक वसाहत माजी चेअरमन राजेंद्र शिंदे,कारखानदार, गाळेधारक, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.