कर्मवीर स्व. शंकरराव काळे साहेब व माजी आमदार अशोक दादा यांच्या प्रेरणेने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपपदार्थ निर्मिती सहाय्याने ऊस उत्पादकांना सर्वोच्च ऊस खरेदी भाव देणार – अध्यक्ष आणि आमदार आशुतोष काळे

-
कर्मवीर स्व. शंकरराव काळे साहेब व माजी आमदार अशोक दादा यांच्या प्रेरणेने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपपदार्थ निर्मिती सहाय्याने ऊस उत्पादकांना सर्वोच्च ऊस खरेदी भाव देणार – अध्यक्ष आणि आमदार आशुतोष काळे
कोपरगांव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या तीन दशकांतील यशस्वी वाटचालीत काळे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी ऊस उत्पादकांना कायम सर्वोच्च ऊस खरेदी दर दिला आहे.हीच परंपरा कायम ठेवणार असल्याची ठाम ग्वाही कारखाना अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या 71 व्या गळीत हंगामातील अग्नी प्रज्वलित समारंभ कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली, व व्हा. चेअरमन मा.श्री. प्रविण शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ. गौरीताई शिंदे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करुन पार पडलेल्या समारंभात आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले,
गत चाळीस वर्षांत ऊस टंचाई, ऊस खरेदी दरात होणारी विक्रमी वाढ याउलट साखरेला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळणे, केंद्र व राज्य सरकारची धोरणात्मक बंधने, निसर्गातील असंतुलित बदलाशी झगडून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त ऊस खरेदी दर देणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे साहेब व माजी आमदार अशोक दादा काळे यांच्या प्रेरणेने कायम जास्तीत ऊस खरेदी भाव देणे केवळ को जनरेशन वीज, अल्कोहोल निर्मिती,साखर उत्पादनावर शक्य नसल्याने लवकरच विविध उपपदार्थ निर्मिती केली जाणार आहे.

नगरपालिका, ता. पं. समिती, जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण निश्चित झाले असून या वेळीही सामूहिक बळावर विजयी श्री आपण खेचून आणणार असल्याचा ठाम
विश्वास आम.काळे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, डॉ. मच्छिन्द्र बर्डे, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम, सुनिल मांजरे, मनोज जगझाप, ॲड राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, अशोकजी मवाळ, प्रशांत घुले, सौ. वत्सलाबाई जाधव, सौ. इंदुबाई शिंदे, श्रावणजी आसणे, गंगाधर औताडे, कर्मवीर शंकरराव काळे उद्योगसमूहातील चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आदी उपस्थित होते.







