अध्यात्मातुन नैतिक संस्कार मुल्यांची शिकवण-विवेकभैय्या कोल्हे
अध्यात्मातुन नैतिक संस्कार मुल्यांची शिकवण-विवेकभैय्या कोल्हे
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव :-
भौतिक प्रगतीत मानवाने मोठे योगदान दिले मात्र गतीमान जीवनप्रणालीमुळे मानसिक स्वास्थावर दुरगामी परिणाम होत आहे. बालमनांवर अध्यात्मीक संस्कार होणे महत्वाचे असुन त्यातुन नैतिक मुल्यांची शिकवण मिळते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती निमीत्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित प. पू. मोरेदादा यांच्या आर्शिवादाने दत्त जयंती निमीत्त श्रीगुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता सौ. रेणुकाताई व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे या उभयतांच्या हस्ते करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्तविकात कारखान्याच्या प्रगतीचा आढावा देवुन सभासद कामगार बांधवासह कारखाना कार्यस्थळावर आयोजित केल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कोपरगांव तालुका महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या अध्यक्ष सौ. रेणुकाताई कोल्हे म्हणाल्या की, दिंडोरीप्रणित मोरेदादा स्वामी समर्थ दरबाराच्या माध्यमांतुन बालमनांवर संस्काराची रूजवण होते, माझी आई देखील स्वामी समर्थ मार्गात असल्यांने तिच्यापासून अनंतकाळाची शिकवण आपल्याला लाभलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
गेल्या सतरा वर्षापासुन कारखाना कार्यस्थळावर श्री गुरूचरित्र पारायण सोहळयाचे यशस्वी आयोजन केले जाते. यंदाचा चौतीसावा पारायण सोहळा असुन त्यात ९८ पारायणार्थी सहभागी झाले आहेत. याप्रसंगी उपाध्यक्ष मनेष गाडे, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे त्यांचे सर्व सहकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, युवक, युवती, महिला, भाविक भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे सुत्रसंचलन संगणक विभागाचे चंद्रकांत जाधव यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दत्त जयंती निमीत्त श्री गुरूचरित्र पारायण सोहळयाची सांगता अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, सौ. रेणुकाताई कोल्हे या उभयतांच्या हस्ते झाली,
भौतिक प्रगतीत मानवाने मोठे योगदान दिले मात्र गतीमान जीवनप्रणालीमुळे मानसिक स्वास्थावर दुरगामी परिणाम होत आहे. बालमनांवर अध्यात्मीक संस्कार होणे महत्वाचे असुन त्यातुन नैतिक मुल्यांची शिकवण मिळते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती निमीत्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित प. पू. मोरेदादा यांच्या आर्शिवादाने दत्त जयंती निमीत्त श्रीगुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता सौ. रेणुकाताई व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे या उभयतांच्या हस्ते करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात कारखान्याच्या प्रगतीचा आढावा देवुन सभासद कामगार बांधवासह कारखाना कार्यस्थळावर आयोजित केल्या जाणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली.