राज्याचे नविन साखर आयुक्त अनिलजी कवडे यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत.
राज्याचे नविन साखर आयुक्त अनिलजी कवडे यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत.
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव :—
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून अनिलजी कवडे यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी साखर संकुल पुणे येथे नुकतेच स्वागत केले.
महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुददयावर चर्चा करत सहकारातील इनोव्हेटोव्ह, सर्वोत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमतेचा आदि पुरस्कार मिळवत राज्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा नांवलौकीक असल्याची माहिती देतांना
अनिलजी कवडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी दिल्या.
.
राज्य साखर आयुक्त अनिलजी कवडे यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदी कार्यरत होते यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या सहवासात काम करतांना स्व. कोल्हे साहेब यांनी केलेले अमुल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्यावर माझ्या शासकीय सेवेतून उत्तम जनसेवा घडल्यामुळे हा बहुमानाचा कार्यभार राज्य शासनाने माझेवर सोपविला असल्याचे गौरवोद्गार मान. कवडे यांनी काढले.