Breaking
ई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

सर्वोत्तम कर्तबगारीने जनहृदय जिंकणारा विश्वासार्ह सिकंदर युवा आमदार आशुतोष काळे !!!

संपादक - अरुण आहेर

0 0 1 6 9 0

सर्वोत्तम कर्तबगारीने जनहृदय जिंकणारा विश्वासार्ह सिकंदर युवा आमदार आशुतोष काळे !!!

 🔥 आग न्यूज पोर्टल

गत ७० वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षण, आर्थिक, रोजगार विकासासाठी अहोरात्र सर्वस्व पणाला लावणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या तीनही पिढ्यां ग्रामीण जनतेच्या महाराष्ट्र ऑयडॉल ठरल्या आहेत.

या कुटुंबांची आगळीवेगळी वैशिष्ट्ये म्हणजे कर्मवीर स्व. शंकररावजी काळे साहेब,सौ. सुशिलामाई शंकरराव काळे, माजी आमदार अशोकराव काळे, सौ. पुष्पा वहिनी काळे,, आमदार आशुतोष काळे, सौ. चैताली काळे या तीन पिढ्यांनी सतत आगळीवेगळी जनविश्वास हर्ता आपल्या ग्रामीण संपर्कातून मिळविली आहे.

ह्याच संस्कारांच्या बळावर ३० व्या वर्षांपासून अनंत प्रतिकूल संकटांवर मात करुन आशुतोष काळे यांनी वयाच्या अवघ्या पंचविशीत ग्रामीण समस्या आंदोलनांचा धडाक्याने शुभारंभ करून जनपाठिंब्यांचे बळावर प्रथम कोपरगांव तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तर अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक पदी सहज निवडून आले.यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय संपादन केला, याच दरम्यान त्यांच्या सासूबाई राजश्री घुले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याने जिल्हापरिषद निधी उपलब्ध झाला. आमदारकी पाठोपाठ जेष्ठ खासदार शरद पवार यांनी त्यांचेवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील श्री साई संस्थान व रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष पदांची जबाबदारी सोपवली.

याशिवाय महाआघाडीचे राज्य अर्थमंत्री नाम. अजित पवार यांच्या मदतीने कोपरगाव तालुक्यात विक्रमी स्वरूपात , केंद्र व राज्य शासनाचा हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणून कोरोना रोगप्रतिबंधक उपचार, लसीकरण, पिडीतांना आर्थिक मदत, कोपरगाव शहर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाचवा जलसाठवण तलाव, साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ , चासनळी – सावळीविहीर,पोहेगांव-रांजणगांव देशमुख, वैजापूर – कोपरगाव,धामोरी – कोपरगाव, संवत्सर – वारी ,पोहेगांव – कोपरगांव, कोपरगांव – कोळपेवाडी रस्त्यांची कामे,तालुक्यात आरोग्य सेवा केंद्रे उभारणी, निराधार, अपंग, वृध्द, विधवा परित्यक्ता, मनोरुग्ण आर्थिक सहाय्य, रांजणगाव देशमुख संयुक्त पाणी योजना, शासकीय, पोलीस,न्यायालयीन इमारती सुविधा,सर्व जाती , धर्मांच्या समाज मंदिर, विकास भवन आदी विविध स्वरूपाची कामे पूर्णत्वास नेली व काही कामे प्रगतीपथावर आहे.

कोपरगाव सहकारी साखर कारखाना उभारणीनंतर कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे विस्तारीकरणासाठी नगर जिल्ह्यात आलेंअसता कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या घरी त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या भेटीत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे अशक्य असल्याने महाराष्ट्र राज्य कायमस्वरूपी गुलामगिरीत जगेन याच भितीने मी माझ्या अंगावर असलेल्या केसांच्या अनेक पटीने गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊ शकणार नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विना चप्पलेचा रांत्रदिवस दरवर्षी फिरत राहील. याकरिता राज्यातील उद्योजक, जमिनदार यांनी ग्रामीण भागात धनलक्ष्मी आणि सरस्वती यांची सांगड घातली तर महाराष्ट्र राज्य देशात अव्वलस्थानी राहील . याकरिता आपण मला सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती केली यावर कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी रयत शिक्षण संस्था विस्तारिकरणाचा विडा उचलला.त्यांना त्यावेळी केवळ माजी केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे साहेब, माजी आमदार पी. बी. कडू यांनीच सर्व प्रकारचे बल पुरविले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतरही रयत शिक्षण संस्थेला आजही काळे-कोल्हेंच्या तीन पिढ्यांचा मदत करण्यात सिंहांचा वाटा आहे. हाच वारसा माजी आमदार आशुतोष अशोक काळे, सौ.पुष्पाताई काळे आमदार आशुतोष काळे व सौ.चैताली काळे समर्थपणे चालवित आहे.म्हणूनच जेष्ठ खासदार शरद पवार यांनी त्यांच्यावर रयत शिक्षण संस्थेचे अहमदनगर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यावर आमदार आशुतोष काळे यांनी विविध विकासात्मक कामे घडविली.

वास्तविक पाहता कोपरगांव तालुका सर्वं दिशांना संपूर्ण देशाला मध्यवर्ती ठिकाणावरून जोडणारा पठारी प्रदेश असल्याने त्याचे महत्त्व ब्रिटिशांनी ओळखले. त्यांनी गंगापूर व दारणा धरणांचे पाणी शेती आणि उद्योगाला पुरविले मुंबई ठाणे नंतर मनमाड -पाटस रेल्वे व रस्ते वाहतूक सुरु केली याचमुळे सन १९७० पर्यंत हा परिसर भारताचा कॅलेफोर्निया ओळखला गेला. गुळ व साखरेची बाजारपेठ म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकला.

परंतु या परिसराला स्वत:चे स्वतंत्र पाणी स्त्रोत नसतांना नासिक – संभाजीनगर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, आणि औद्योगिककरणाने गोदावरी उर्ध्व खोऱ्यात जायकवाडी, मुकणेसह लहान मोठी १७ वर धरणे बांधली गेली.यामुळे कोपरगावला धरणांच्या पाणी वाटपात निम्म्या पेक्षा जादा स्वरूपात मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी फटका बसला आहे. तसेच कृषी जमीन कमाल धारणा कायद्याखाली गेली पन्नास वर्षे वापरात असलेल्या बारामाही पाणीपुरवठा ब्लॉकपैकी निम्मे रद्दबातल केले तर शिल्लक ब्लॉकचे नुतनीकरण करण्यात येत नाही. यामुळे या गोदावरी डाव्या – उजव्या कालव्यांचे लाभधारकांनी पाणीपट्टी, विविध स्वरूपात केंद्र व राज्य शासनाचे कर , अनेक राष्ट्रीय व स्थानिक विकास व आपत्तीत खुल्या हस्ते तसेच दारणा, गंगापूर,मुकणे , नांदूर मध्यमेश्वर धरणे- कालवे यांचा संपूर्ण उभारणी व व्यवस्थापन खर्च , केव्हांच वसूल करून दिला आहे. तरीही दुर्दैवाने राज्य शासनाने या कालव्यांचे लाभधारकांना सावत्रपणाची वागणूक देण्याचा विडा उचलला असल्याचे अनुभवास येत आहे.याचा वाईट अनुभव सन २०१६ ला कोपरगांव तालुक्यातील लाभधारकांना सहा महिन्यांचे अंतराने दोनदा पाणी शेतीला मिळाले. या कालव्यांची कार्यक्षमता व वापर कालावधी केव्हाच संपला आहे. यासाठीआमदार आशुतोष काळे गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यांचे इस्त्रायल जलवितरण कायद्याच्या व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरातून या कालव्यांची कामे पूर्ण करावीत.

याशिवाय मुंबई – आग्रा महामार्गावर घोटी जवळ रेल्वे आणि महामार्ग वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधून दारणा धरणाची उंची वाढविणे , नासिक जिल्ह्यातील उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून वाया जाणाऱ्या पाण्यापैकी किमान २० % पाणी अडवून नासिक व नगर जिल्ह्यासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला कायमस्वरूपी पुरवावेय आदी मागण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे.

ह्या परिसरात महायुती केंद्र व राज्य सरकारांनी अवघ्या 10 वर्षात श्री साई बाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ, पाच राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग,नियोजित मुंबई -नागपूर -कोलकता बुलेट ट्रेन- कामे आगामी काळात पूर्णत्वास नेण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. या शिवाय कोपरगांव  ३०० किलोमिटर सभोवताली भागात पूणे , संभाजी नगर , मुंबई, ठाणे, नासिक सोलापूर, जळगाव जालना महापालिका परिसरात आंतरराष्ट्रीय ,देश पातळीवरील विमानतळ, ऐतिहासिक ,प्रेक्षणीय, प्राचीन – -अर्वाचीन तिर्थक्षेत्र, औद्योगिक वसाहती , आंतरराष्ट्रीय- राष्ट्रीय उद्दृयोग अगणित स्वरूपात आहेत याशिवाय संवत्सर , पोहेगावात आय.टी हब ( वॉटर लेस इंडस्ट्री ) निर्मिती साठी शासकीय दरबारात पाठपुरावा केला जात आहे. समृध्दी महामार्ग प्रकल्पातील दोन विविध अत्याधुनिक सुविधा पुरविणारी दोन नवनगरे शिर्डी परिसरात ५०२ एकरातील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित औद्योगिक वसाहत निर्मिती प्रगती मार्गावर असल्याने देशातील सर्व शेवटच्या गावापर्यंत व परदेशात कृषी व औद्योगिक उत्पादन निर्मिती तसेच कमीतकमी वेळात कमी खर्चात व नुकसानीत पाठविण्याकरिता कोपरगांव शहर व तालुका सर्व उत्पादने,सेवांचे हब ठरणार आहे. असे सर्वं प्रकारचे आव्हान आमदार आशुतोष काळे यांनी केंव्हाच स्विकारले असल्याने ते तळागाळातील गरजू आबालवृद्ध,युवकांचे मसिहा ठरल्याने कोणतेही पक्ष,आघाड्या आल्यातरी सामान्य जनतेकडून त्यांनाचआमदारकी बहाल करण्याच्या ठाम निर्धार व्यक्त केला जात आहे .

अशा कर्तृत्वशाली जिद्दी युवक आमदार आशुतोष काळे आणि काळे परिवारास अविश्वसनीय कामगिरी करण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारचे बल, दिर्घायुष्य कायमस्वरूपी सुखसमृद्धीचे आरोग्यदायी जाण्यासाठी देवो आणि त्यांच्या शुभ हस्ते अभिनंदनीय सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 6 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे