गौतम सहकारी बॅंकेच्चा नविन शाखेचे येवला येथे कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे शुभ हस्ते शुभारंभ
संपादक - अरुण आहेर
गौतम सहकारी बॅंकेच्चा नविन शाखेचे येवला येथे कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे शुभ हस्ते शुभारंभ
🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगांव – येवला (जि. नाशिक) येथे सुरु करण्यात आलेल्या गौतम सहकारी बँकेच्या नवीन शाखेचा सुप्रसिद्ध उद्योजक व कापसे पैठणीचे मालक मा.श्री. बाळासाहेब कापसे यांच्या शुभहस्ते व आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
तसेच यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी श्रीक्षेत्र कोटमगाव येथे श्री जगदंबा मातेचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अंबादासजी बनकर, नगराध्यक्ष बंडूजी क्षीरसागर, माजी नगरसेवक गणेशजी शिंदे, प्रमोदजी ससकर, बबनराव जगझाप, अमोल जगझाप, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विश्वासराव आहेर, अरुणजी चंद्रे, कोटमगाव जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमने, बाबासाहेब कदम, दिलीपराव कोटमे, श्रावण भोरकडे, विनायक सरोदे, मधुकर कोटमे, गौतम सहकारी बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, मान्यवरांसह येवला शहरातील उद्योगजक, व्यापारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.