Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील अन्याय ग्रस्त शिक्षकांचे सर्वं प्रल़ंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावणार — विवेक कोल्हे

संपादक : अरुण आहेर

0 0 1 7 8 3

राज्यातील अन्याय ग्रस्त शिक्षकांचे सर्वं प्रल़ंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावणार — विवेक कोल्हे

कोपरगाव : शिक्षक हे संपूर्ण मानवी जीवन विकास जडणघडणीत़ील कायमस्वरूपी मजबूत महत्वाचा कणे आहेत. परंतु अनेक कारणांनी शिक्षकांवर कळत – नकळत अन्याय घडतो.तसेच त्यांच्या कौटुंबिक , शैक्षणिक कार्यात सतत विविध कारणांमुळे प्रचंड समस्या निर्माण होतात. या समस्या सोडविण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आपण भावी काळात शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार असल्याची ठाम ग्वाही विवेक कोल्हे यांनी नासिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करतांना दिली.

महाराष्ट्र राज्यातील नाशिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघात सर्वप्रथम विवेक कोल्हे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

सहकार आणि शिक्षण कर्मयोगी , माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू , देशातील अव्वलस्थानी असलेल्या संजीवनी उद्द्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि भाजपच्या माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील इफको कृषी सहकारी संस्थेंचे संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, देशातील अग्रगण्य संजीवनी शिक्षण समूहाचे कार्यरत व्यवस्थापन सदस्य, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष स्थानिक सल्लागार समिती सदस्य म्हणून गेल्या दहा वर्षात कायम यशस्वी कारकीर्द गाजवणारे युवा नेतृत्व विवेक कोल्हे यांनी दि.३१ मे रोजी राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक महाराष्ट्र राज्य विधान परिषद शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज नासिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राधाकृष्ण गमे यांच्याकडे सुपूर्द करत दाखल केला.

याप्रसंगी नासिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माजी.सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, के के वाघ शिक्षणं संस्थेचे श्री. समीर वाघ,प्रा.श्री.साळुंके सर, श्री.राजेंद्र कोहकडे, प्रा.श्री.अजयकुमार ठाकूर, प्रा.श्री.रावसाहेब शेंडगे, सचिन देसले आदीसह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

या वेळी प्रतिक्रिया देताना विवेक कोल्हे म्हणाले की शिक्षक हे देशाचा आई-वडीलाप्रमाणे अपरिवर्तनीय कणा आहे.प्रत्येक शिक्षक राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात.मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी मी योग्य योगदान द्यावें अशी आग्रही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या कोल्हे कुटुंबियांकडे सतत या क्षेत्रातील विविध मान्यवरांनी वेळोवेळी करतांना मलाही मी हे कार्य कसे करू शकतो हे माझ्या शंकांच्या प्रश्नावरील समाधान कारक उत्तरातून पटवून दिले यामुळे नासिक विभागीय विधानपरिषद मतदारसंघ निवडणुक लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे.अनेक शिक्षक संघटना,पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

प्रश्नांच्या गुंत्यात शिक्षकांना अडकून ठेऊ नये.शिक्षक पवित्र ज्ञानदानाचे काम करतात त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मला काम करण्याची ही संधी आहे असे मी मानतो.इतर देशांच्या तुलनेत भारताची क्षमता मोठी आहे मात्र शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्ष सुटत नसतील तर त्यासाठी कुणीतरी पुढे होऊन सक्षम लढणे गरजेचे आहे.आमच्या कोल्हे कुटुंबांच्या तीन पिढ्यांचा शैक्षणिक, औद्योगिक कृषी, सहकारी आर्थिक सामाजिक , आरोग्य क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित आधारित हा सेवा हाच सुसंस्कारित धर्मवसा आमच्या रक्त मांसात भिनल्याने आमची सामाजिक जबाबदारी आहे.

या संस्कारानुसार आमच्या तीन पिढ्या प्रामाणिक पणे सर्वस्व पणाला लावून कार्यरत राहिल्याने आज आम्ही ज्या संस्थामध्ये योगदान दिल्याने या संस्था देश पातळीवरील कार्यात यशस्वी ठरल्या आहेत सहकार आणि शैक्षणिक कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून रयत शिक्षण संस्था विस्तारात सलग ५० वर्षे सर्वस्व पणाला लावले आहे. तसेच महाराष्ट्रातील युवकांना जन्मभूमीत. कायमस्वरूपी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित रोजगार शिक्षण मिळावे यासाठी ४० वर्षांपूर्वी संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाची यशस्वी मुहूर्त मेढ रोवली.

आजपर्यंत या संस्थेने लाखों तरूणांना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला आहे.याचमुळे शैक्षणिक क्षेत्रात आमच्या कोल्हे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी सर्वस्व वाहिले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नासिक विभागीय कार्यक्षेत्रात पाचही जिल्ह्यातील विविध पातळ्यांवर आमचे जवळचे सहकारी आणि नातेवाईकांच्या दर्जेदार शिक्षण संस्था कार्यरत आहेत यामुळेच मला कायम प्राथमिक , माध्यमिक , महाविद्यालय संस्था व्यवस्थापन आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या परिचीत असून शासन दरबारी सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यांच्या अनुभव बळावर शिक्षकांचा सन्मान टिकावा आणि त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी मी सर्वस्व पणाला लावणार आहे . माझी उमेदवारी ही शिक्षकांच्या आशीर्वादाने आहे त्यानुसार मी पूर्ण ताकदीने सकारात्मक कामाच्या रूपाने ही निवडणूक जिंकणार आहे असा विश्वास विवेक कोल्हे यांनी याप्रसंगी बोलतांना व्यक्त केला.

आपल्या या निवडणुकीत आमदार सुधीर तांबे यांचे काही मार्गदर्शन आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निश्चितच पाचही जिल्ह्यात संस्था चालक,शिक्षक,संघटना यांच्या भेटी घेतल्या असता माजी आमदार सुधीर तांबे यांचे गौरवशाली कार्याने मी कायम प्रभावित झालों आहे तसेच अनेक संस्थाचालक शिक्षकांच्या संपर्कातून नविन अनुभवी स़स्कार प्राप्त झाले आहे . त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे व त्यांची गौरवास्पद साथ आपल्याला आगामी काळात मिळेल अशी ठाम ग्वाही विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 7 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे