अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका चैताली काळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात तालुका स्तरावरील गणित, विज्ञान, पर्यावरण प्रदर्शन उद्घाटन
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका चैताली काळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात तालुका स्तरावरील गणित, विज्ञान, पर्यावरण प्रदर्शन उद्घाटन
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव —
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे आयोजित तालुकास्तरीय गणित, विज्ञान, पर्यावरण, कला व कार्यानुभव प्रदर्शन २०२३ -२४ चे उदघाटन आज अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी महानंदाचे चेअरमन मा.श्री. राजेश परजणे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, विस्तार अधिकारी श्री जरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू कोळपे, डॉ. सय्यद, बाळासाहेब ढोमसे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य पी.बी. चौरे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती गुंजाळ, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, स्पर्धक, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.