ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल आणि परिवार कोपरगांवकरांना संत कैकाडी महाराज कृपेने दरवर्षी सलग ३१ वर्षे आषाढी वारीच्या निमित्ताने ; घरपोच श्री विठू माउलींचे दर्शन घडवून विठ्ठलभक्त पुंडलिकांचा वारसा जोपासत आहे – माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे
संपादक - अरुण आहेर

ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल आणि परिवार कोपरगांवकरांना संत कैकाडी महाराज कृपेने दरवर्षी सलग ३१ वर्षे आषाढी वारीच्या निमित्ताने ; घरपोच श्री विठू माउलींचे दर्शन घडवून विठ्ठलभक्त पुंडलिकांचा वारसा जोपासत आहे – माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे
अरूण आहेर 🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगांव : येथील जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल हे अहिल्यानगर ते मनमाड हा पठारी प्रदेश संपूर्ण देशाला मध्यवर्ती ठिकाणी सर्वं दिशांना समांतर जोडणारा पठारी प्रदेश असून या परिसरातील 300 किलोमिटर परिसरात सर्वत्र हजारांवर धार्मिक, ऐतिहासिक, प्रेक्षणीय तिर्थ स्थळे आहेत येथून नित्यनेमाने दररोज विविध तिर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणावर पायी दिंड्या जात असतात यापैकी मनमाड वरून पंढरपूरला जाणाऱ्या ह.भ.प. कैकाडी महाराज पायीं दिंडीची आपल्या मातोश्री स्व.किरण देवी यांच्या इच्छेनुसार वारकऱ्यांची सन्मान पूर्वक सेवापूर्ती करतांना छत्रपती संभाजी महाराज पुतळयालगतच्या कृष्णाई मंगल कार्यालयात कोपरगावकरांना श्री विठू माउलीचे साक्षात घरपोच दर्शन घडवून विठ्ठल भक्त पुंडलिक महाराजांचा वारसा जोपासत असल्याचे गौरवोद्गार कोपरगांवच्या पहिल्या भाजप महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी काढले.
स्वर्गीय किरणदेवी खेमचंद अग्रवाल यांच्या विठ्ठल भक्तीसेवा इच्छेनुसार त्यांना श्रीविठू माऊली यांच्या दर्शनासाठी पंढरपुरी जाण्याची आस कायम ह़ोती परंतु विविध कारणांमुळे ही सदिच्छा पूर्णत्वास जात नसल्याने त्यांनी आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्त अहिल्या नगर ते मनमाड रस्त्यांवरील श्री साई चौफुलीवर दिवसभर थांबून वारकऱ्यांची चहा – पाणी , राजगिरा फळांचे वाटप करून सेवा करीत या दरम्यान त्यांची मनमाड येथील संत राजाराम ( कैकाडी ) महाराज यांची भेट होत होती . यावेळी मातोश्री अग्रवाल यांनी महाराजांना धारणगांव रोडवरील आपल्या घरी दिंडी वारकऱ्यांची कोपरगांव मुक्कामी सेवा करण्याची सदिच्छा व्यक्त केली. यामुळे सलग ३१ वर्षे जेष्ठ व्यापारी गुलाब चंद्र अग्रवाल, जगदिश अग्रवाल, नारायण अग्रवाल सौ. सुषमा नारायण अग्रवाल, विरेष नारायण अग्रवाल यांनी यांनी मातोश्री. स्व. किरणदेवी यांच्या सदिच्छा पुर्ती साठी कंबर कसली.
कोपरगांवचे प्रथम उद्योगपती व बांधकाम अभियंता आणि उद्योगपती मनोज अग्रवाल यांचें पिताश्री कांतीलालजी ब्रिजलाल अग्रवाल यांना आणि परिवारास भावी दिर्घायुष्य कायमस्वरूपी सर्वोत्तम सुखसमृद्धीचे सुखदायक आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
या साठी कर्मयोगी स्व शंकरराव कोल्हे, कांतीलाल अग्रवाल, डॉ. डी. एस .मुळे, ज्येष्ठ पत्रकार स्व. सी.बी गंगवाल गंगवाल स्व. छोटुभाई जोगनपुत्रा आणि परिवार , शहरातील वैद्यकीय व्यावसायिक, रोटरी क्लब आदींची साथ लाभल्याने ह भ प राजाराम महाराज व,रामदास महाराज कैकाडी यांच्या दरवर्षी जाणाऱ्या मनमाड ते पंढरपूर पायी दिंडीचे कोपरगांव करांसाठी श्रीविठुमाऊलींच्या दर्शनासाठी दिंडीचा सलग 31 वर्षापासून ज्येष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल यांच्या पुढाकाराने व कर्मयोगी संत तुकाराम गाथेचे गाढे अभ्यासक कर्मयोगी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेने प्रथम बांधकाम अभियंता कांतीलाल अग्रवाल उद्योगपती मनोज अग्रवाल सहकार्याने दरवर्षी मुक्काम कृष्णाई मंगल कार्यालयाजवळ नारायणशेठ अग्रवाल यांच्याकडे असतो, त्यावेळी ते दिंडीतील वारकऱ्यांना दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यावश्यक गरजेच्या वस्तू, प्राथमिक वैद्यकीय औषधे , गोळ्या, आदी साहित्यासह मिष्टान्न भोजन व भेटवस्तू देऊन सन्मानित करीत असतात.
या वर्षी माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे, विवेक कोल्हे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे, हृदय रोग तज्ञ डॉ. दत्तात्रय मुळे, उद्योगपती कैलास ठोळे, कांतीलाल अग्रवाल, नाशिक येथील शल्य चिकित्सक डॉ.मुकेश अग्रवाल, स्त्री व बालरोग तज्ज्ञ डॉ.सौ.ममता मुकेश अग्रवाल,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, युवा पत्रकार सुशांत घोडके, दिंडी चालक भारत महाराज, आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते उपस्थित वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी योगेश जोगनपुत्रा, जितेंद्र गंगवाल, बांधकाम अभियंता माधवराव देशमुख,,योगाचार्य अभिजित शहा, माजी नगराध्यक्ष अशोक कोठारी, जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा सौ. सुधाताई ठोळे ,माजी नगरसेवक गणेश आढाव, जेष्ठ सराफ दिपक विसपुते, संजय लोहाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत घोडके आणि शुभम मनोज अग्रवाल तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन विरेष अग्रवाल यांनी केले .