३४ व्या भि. ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांना ७ डिसेंबर २०२३ला सन्मानित करणार :– अध्यक्ष अशोक रोहमारे
३४ व्या भि. ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांना ७ डिसेंबर २०२३ला सन्मानित करणार :– अध्यक्ष अशोक रोहमारे
आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :– तालुक्यातील पोहेगाव भि. ग . रोहमारे विश्वस्त मंडळातर्फे सन १९८९ पासून दरवर्षी राज्य पातळीवर मराठी भाषेतील उत्कृष्ट कविता, कादंबरी, कथासंग्रह, साहित्य समीक्षा प्रकारच्या प्रकाशित मराठी ग्रामीण ग्रंथ लेखकांची निवड करुन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सन २०२२ वर्षातील भि.ग.रोहमारे पुरस्कारासाठी निवडलेल्या ७ ग्रामीण साहित्यकांना ७ डिसेंबर २०२३ लाख विविध मान्यवरांचे हस्ते सन्मानित केले जाणार असल्याची माहिती भि.ग.रोहमारे विश्वस्त मंडळ अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी दिली
निवड झालेल्या लेखकांमध्ये नागू विरकर (मसाई वाडी, सातारा), गणपत जाधव (यशवंतनगर जि. सोलापूर), आप्पासाहेब खोत (जाखले जि. कोल्हापूर), मनीषा पाटील (देशिंग हरोली, जि. सांगली), प्रवीण पवार (खंबाळ जि. धुळे), डॉ.रवींद्र कानडजे (बुलडाणा),
आम्ही करतो तुमच्या सोन्याचे सर्वोच्च मूल्यांकन
आता समता पतसंस्थे मध्ये मिळावा १० ग्रॅम सोन्यावर रू. ५२,०००/- पर्यंतचे कर्ज…
आजच संपर्क करा,
मोबाईल – ९०० ९०० ३५७२
सुधन गोल्ड लोन
डॉ. मारोती घुगे (अंबड जि. जालना) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख व सहकार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांनी दिली. याप्रसंगी ट्रस्टी रमेश रोहमारे, शोभाताई रोहमारे, संदीप रोहमारे, ॲड. राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ.बी.एस.यादव उपस्थित होते. भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्यप्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०२२ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
हेडाम – नागू विरकर (ग्रामीण कादंबरी – समीक्षा पब्लिकेशन ,पंढरपूर), हावळा – गणपत जाधव (ग्रामीण कथासंग्रह – शब्द शिवार प्रकाशन, मंगळवेढा), काळीज विकल्याची गोष्ट- आप्पासाहेब खोत (ग्रामीण कथासंग्रह, ललित पब्लिकेशन, शिवडी,मुंबई) विभागून, नाती वांझ होताना – मनीषा पाटील हरोलीकर (ग्रामीण कविता संग्रह, संस्कृती प्रकाशन,पुणे), भुई आणि बाई – प्रविण पवार (ग्रामीण कविता संग्रह, परिस पब्लिकेशन, सासवड, पुणे) विभागून, शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श – डॉ.रवींद्र कानडजे (ग्रामीण समीक्षा, नाग-नालंदा प्रकाशन, विशाल नगर, इस्लामपूर), १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती – डॉ. मारुती घुगे (ग्रामीण समीक्षा, यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे) विभागून.
प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख १५ हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावर्षी कथासंग्रह, कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण 67 साहित्य कृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य डॉ. भीमराव वाकचौरे, डॉ. शिरीष लांडगे, लक्ष्मण महाडिक, डॉ. प्रमोद आंबेकर, डॉ. गणेश देशमुख, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. संजय दवंगे यांच्या संयुक्त निवड समितीने केले. वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने आयास (शंकर विभूते) शाळा (ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर),
अस्तित्व गमावलेली माणसं (महेंद्र गायकवाड), शिवार माती डॉट कॉम (प्रा. मुकुंद वलेकर), अंतस्थ हुंकार (शिवाजी शिंदे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड समितीने विशेष निर्देश केला आहे. आजपर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील १७० पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. कोपरगावचे माजी आमदार व कोपरगाव तालुका सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के. बी. रोहमारे यांच्या २६ व्या स्मृतिदिनी ७ डिसेंबर रोजी सकाळी १ वाजता के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव येथे या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे व सुप्रसिद्ध लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे.