Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

अहिल्या नगर जिल्ह्यातील समता सहकारी पतसंस्था भारतात सर्वप्रथम लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, सोनेतारण कर्ज प्राधान्य, विविध १०० टक्के यशस्वी पेपरलेस सुविधा योजना यशस्वीपणे राबवितांना ७९ हजार ९८३ ठेवीदारांना ३८लाख रुपयांपर्यंत ठेवी परत देण्यासह पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना स्व बळावर विमा संरक्षण देत आहे — एशियन असोसिएशन ऑफ कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन ( ॲक्यु ) चे खजिनदार , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 4 7

अहिल्या नगर जिल्ह्यातील समता सहकारी पतसंस्था भारतात सर्वप्रथम लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, सोनेतारण कर्ज प्राधान्य, विविध १०० टक्के यशस्वी पेपरलेस सुविधा योजना यशस्वीपणे राबवितांना ७९ हजार ९८३ ठेवीदारांना ३८लाख रुपयांपर्यंत ठेवी परत देण्यासह पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना स्व बळावर विमा संरक्षण देत आहे – एशियन असोसिएशन ऑफ कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन ( ॲक्यु ) चे खजिनदार , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे

  आग न्यूज पोर्टल

कोपरगांव – देशातील अग्रगण्य समता सहकारी पतसंस्थेने अवघ्या ३८वर्षामधील चार महापूर, दर तीन वर्षांनंतरचे दोन वर्षांचे दुष्काळ, कोरोना साथीचा सलग तीन वर्षातील संपूर्ण बाजारपेठ बंदी दणका, अचानकपणे १००० व ५०० रुपयांची नोटा बंदी , कोपरगांव तालुका मर्चंट बॅंक समाप्ती, जागतिक बाजारपेठ मंदी, सहकारी संस्थांमधील वाढता भ्रष्टाचार व बुडीतेचे विक्रमी प्रमाण, आदी प्रकारच्या शेकडो जीवघेण्या अडचणींना तोंड देत अवघ्या ३८वर्षात ९५६कोटी ४१ लाख रुपयांच्या ठेवी पर्यंत समता सहकारी पतसंस्थेनेमजल मारली आहे. मार्च २०२४ अखेर १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला जाणार ही काळ्या कुट्ट दगडावरील न पुसणारी गडद पांढरी ( सफेद) रेघ आहे. त्यामध्ये ९९.८१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी ३८ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी स्वबळावर कोणत्याही क्षणी तातडीने देण्याची मजबूत क्षमता समता सहकारी पतसंस्थेने केंव्हाच मिळविली आहे.

तसेच समता पतसंस्थेत १ते५लाख रुपया पर्यतच्या ७९ हजार ९८३ ठेवीदारांच्या २६१ कोटी ०७ लाख रुपयांच्या ठेवी असून समताची३० सप्टेंबर २०२४ला स्वगुंतवणुक २१९ कोटी ७१ लाख रुपये,रोकड व बॅंक शिल्लक ७ कोटी ७९लाख रुपये,ठेव तारण कर्ज ४७ कोटी ३० लाख कोटी रुपये अशी एकत्रित२७४कोटी८० लाख रुपये सुरक्षित स्व गुंतवणूक आहे. समता पतसंस्थेच्या ९४.६४टक्के ठेवीदारांच्या ठेवी रकमेपेक्षा संरक्षक स्वठेवींच्या रकमेचे प्र‍माण जादा असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठेवीदारांच्या ठेवी मागता क्षणी देण्यास समता तयार असल्याची ठाम ग्वाही दिपावली २०२४ निमित्ताने सर्वसामान्य जनतेला हार्दिक शुभेच्छा मुलाखती मध्ये समता सहकारी पतसंस्था यशस्वी घोडदौड याविषयी असोसिएशन ऑफ कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन ( ॲक्यु ) चे खजिनदार, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष, समता सहकारी पतसंस्था अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी बोलताना दिली.

यावेळी बोलताना समता पतसंस्था अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी एकूण ६६८ कोटी २५ लाख रुपयांच्या कर्जापैकी ४४७ कोटी ५०लाख रुपयांचीसोनेतारण कर्जे म्हणजे ६६ टक्के असल्याने गेल्या अडीच वर्षांपासून सोने तारण कर्जापैकी एक पैशाची थकबाकी नाहीं शिवाय आम्ही खाजगी सावकार, कंपन्या पेक्षा कमी दराने तातडीने कर्ज पुरवठा करून सर्वसामान्य ग्राहकाचा कायम दुवा घेत आहोत.

सन २०१८ पर्यंत मालमत्ता तारण कर्जे समता सहकारी पतसंस्था देत होती परंतु मालमत्तेवर जरी समता पतसंस्थेचा कर्जतारण कब्जा आणि वसुली करताना मालमत्ता जरी अधिकृत कायदेशीररीत्या सहकारी संस्थांकडे तारण असली तरीही पहिल्यांदा मालमत्ता जप्तीपुर्वी राज्य शासनाच्या सहकार खात्याच्या सहकार कायद्यातील कलम १०१ चा कर्ज वसुली दाखला मिळविण्यासाठी मारलेल्याअनंत चकरा नंतर फार मोठ्या दिरागाईने दाखला मिळतो आपण मालमत्ता विक्रीस काढल्यावर लिलावात बोलीदार कधीच वेळेवर मिळत नाही.याशिवाय त्यांच्या सोयीने सहकारी संस्थेला घातक अटी नाईलाजाने स्विकारण्याची नामुष्की सहकारी संस्थांवर आल्याने त्यांचे विविध स्वरूपात नुकसान सोसावे लागले एवढे करूनही जरी बोलीदार मिळाला तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून ही शासकीय कार्यबाहुल्यामुळे अधिकृत ताबा वेळेवर मिळत नसल्याने सहकारी संस्थांना फार मोठी झळ सोसावी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगम मालमत्ता तारण जरी घेतले तरी ही प्रत्यक्ष ताबा कर्जदारांकडे असतोच सहजासहजी हा ताबा न सोडण्यासाठी कर्जदार जिवाचे रान करतो यामुळे सहकारी पतसंस्था अडचणीत येते ह्यासह सर्व धोके,विविध समस्या व आर्थिक खर्चाची सहन करावी लागणारी झळ विचारात घेऊन शेवटी नाईलाजाने समता सहकारी पतसंस्थेला सोनेतारण कर्ज योजनेला प्राधान्य द्यावे लागले कारण कर्ज तारण सोने आर्थिक सहकारी संस्थांच्या ताब्यात असल्याने याचा समता सहकारी पतसंस्थेला निश्चित फायदा झाला आहे.

समता सहकारी पतसंस्थेत सुरक्षित लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्किम प्रगत राष्ट्रांप्रमाणे भारतात प्रथम यशस्वीपणे राबविली जाते कारण महाराष्ट्र राज्यातील सहकारी पतसंस्था मध्ये तळागाळातील जनतेने बचत करून स्थानिक पातळीवर आपल्या ओळखीच्या, नात्यातील संचालकावर विश्वास ठेवून हजारो कोटी रुपयांच्या ठेवी विविध स्वरूपात ठेवल्या आहेत . सहकारी संस्थांचे पदाधिकारी अथवा व्यवस्थापन मालक नसून विश्वस्त आहेत . याच ठेवीच्या रकमा गरजू आणि प्रामाणिक ग्राहक कर्जदारांना अल्प व्याजदराने दिल्या तरच संबंधित पतसंस्था आणि ठेवीदारांना उत्तम रितीने लाभ होतो. परंतु कर्जदाराने वेळेवर ठरलेल्या मुदतीत व रक्कम न भरल्यास कर्जदारासह , ठेवीदार , पतसंस्था अडचणीत येतात .अशा परिस्थितीत समता सहकारी पतसंस्था कायम वाईट पणा घेऊन कायदेशीर रित्या कर्ज वसुली करण्यास कायम प्राधान्ये देत आहे.
गत २० वर्षा पासून सहकारी, राष्ट्रीय आर्थिक संस्थाचे कर्ज बुडविणाऱ्यांची त्सुनामी कायम स्वरुपी चक्रवाढ विक्रमी स्वरूपात दरवर्षी वाटचाल करीत असल्याने ठेवीदारांच्या लाखों कोटी रुपयांच्या ठेवी बुडाल्या आहेत बुडत आहे.

दुर्दैवाने कर्जवसुलीचे कायदे अत्यंत किचकट, कुचकामी ठरतांना कायदेशीर कामकाज प्रणाली अती प्रमाणात खर्चिक आणि वेळखाऊ झाली आहे याबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशने सतत स्थानिक तसेच राज्यपातळीवर केंद्र व राज्य शासनकडे निवेदने, शिष्टमंडळामार्फत ,चर्चाविनिमय, एक दिवस ते प्राणांतिक उपोषण आदी मार्गानेच लढे दिले आहे. यात काही प्रमाणात चांगले यश मिळाले आहे तरीही सतत ग्रामीण व शहरी आर्थिक सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झाल्या आणि होत असल्याने कर्जबुडी कायमची संपविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता सहकारी पतसंस्था अंतिम क्षणापर्यंत लढणार हेच निश्चित असले तरीही या संकटातून वाचविण्यासाठी केवळ नि केवळ कर्जबुडी प्रवृत्तीला कायमस्वरूपी कोणतीही दयामाया न दाखवता मूठमाती देवून कर्ज दाराला त्याने घेतलेल्या कर्जाचा विनियोग फक्त आणि फक्त त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच व्हावा याच एकमेव अटीवर संबंधित आर्थिक संस्थांनी कायद्याच्या चौकटीतच संपूर्ण संस्था हस्तक्षेपी नियंत्रणातून योग्य अंमलबजावणी करणे हाच एकमेव पर्याय पतसंस्थाच नव्हे तर संपूर्ण देशातील आर्थिक सहकारी चळवळ मजबूतीचा पाया ठरणार हे निश्चित आहे. याच करिता आजच्या वेळेस प्रथम महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था सह केंद्र आणि महाराष्ट्र राज्य शासन ,सर्व सहकारी संस्था यांनी हातात हात घालून प्रामाणिकपणे योग्य नियोजन केल्यास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था चळवळ ही जगातील सहकार चळवळीसाठी आदर्शवादी दिपस्तंभ ठरेल असा ठाम आत्मविश्वास ओमप्रकाश कोयटे यांनी देवून समता सहकारी पतसंस्थेने आपल्या ३८वर्षाच्या संघर्ष निवेदन करतांना

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांचा ३८ वर्षाचा विश्वास संपादन केलेला आहे. या ३८ वर्षात समता पतसंस्थेने आर्थिक प्रगती करताना विविध संकटांना सामोरे जात सुख दुःखाचे क्षण अनुभवलेले आहेत. तसेच महाराष्ट्रात सामाजिक कार्यातही एक मोठा नावलौकिक मिळविलेला असून ३८ वर्षांपूर्वी ११ मे १९८६ रोजी कायमस्वरूपी दर पाच वर्षांनी सलग तीन वर्षे दुष्काळ पाचवीला पुजलेल्या कोपरगांव शहरात…

माझ्या वयाच्या २६ व्या वर्षापासून सहकार चळवळीत काम करत असतांनाच. १९७८ साली गावातील नामांकित को – ऑप. बँकेत संचालक पदासाठी उभा राहीले. प्रचंड मताधिक्याने निवडूनही आलो.आल्यानंतर १९८५ लाही कोपरगांव तालुका मर्चंट- ऑप. बँकेवर व्हा. चेअरमन, संचालक अशा वेगवेगळ्या पदांवर काम केले. परंतु त्या ठिकाणी मी किराणा दुकानदारांचा प्रतिनिधी होतो. माझे स्वतःचे किराणा दुकान होते. कोपरगाव तालुक्यातील किराणा मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष होतो. त्यावेळी बँका, पतसंस्थांमध्ये छोट्या दुकानदारांची कामे होत नव्हती. त्यामुळे १९८६ साली समता पतसंस्थेची स्थापना केली. त्यापूर्वी १९८१ साली निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था, १९८३ साली घरकुल गृह तारण संस्था, शहर सहकारी भांडार अशा प्रकारे सहकाराच्या माध्यमातून उपक्रम सुरू केले. ४० वर्षापासून या पतसंस्था चळवळीत मी काम करत आहे. छोट्या दुकानदारांची कामे व्हावीत. त्यांना त्यांच्या उत्पन्नावर योग्य मोबदला मिळावा. त्यासाठी कोपरगाव शहरातील मित्रांनी एकत्र येऊन भिशी, मनी सर्क्युलेशन स्कीमची संकल्पना सुरू केली. त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी ११ मे १९८६ ला समता नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज समताला ३८ वर्षे पूर्ण झालेली आहे.

११ मे १९८६ ला समता पतसंस्थेची स्थापना केल्यानंतर १९९४ ला आमच्या ठेवी १ कोटी पर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. तेव्हा आम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये ‘समता कोट्याधीश झाली, आम्ही कोट्याधीश झालो’. अशी जाहिरात केली होती. त्यानंतर १९९९ ला आम्ही तब्बल १० कोटी रुपयांचा आकडा पार केला. २०११ साली १०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला. त्या वेळेस देखील आम्ही जाहिरात केली होती की, आम्ही अब्जाधीश झालो. २०२० ला ५०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला. तो सुद्धा समताच्या प्रगती मधील महत्त्वाचा टप्पा होता. २०२४ या वर्षांमध्ये देखील ९५६ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा आम्ही गाठलेला आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत समताच्या ठेवींचा आकडा १ हजार कोटी रुपयांच्या पुढे निश्चित जाईल याची खात्री आहे. हे झाले प्रगतीच्या वाढीचे टप्पे.
परंतु या ३८ वर्षांमध्ये अनेक संकटांचा सामना समताला करावा लागला. त्यात पहिले संकट ६ डिसेंबर २००६ ला वर्तमानपत्रात आलेल्या विपर्यास्त वृत्ताने समताच्या ठेवी २००६ साली ५७ कोटी रुपयांच्या होत्या. त्या पुढील ३ आठवड्यात ४१ कोटी पर्यंत घसरल्या. तब्बल १६ कोटी रुपये त्या वेळेस कमी झाले होते. तसेच कोपरगाव शहरात दर दहा वर्षांनी पावसाळ्यात महापुर येत असतो. ९ सप्टेंबर २०१९ ला महापूरात ् समताच्या मुख्य कार्यालयात पाणी शिरल्याने पूर्ण रेकॉर्ड व फर्निचर वाहून गेले होते. फर्निचरची तुट फूट झाली होती. त्या वेळेस सुद्धा समता वाहून गेली, समतात पैसे शिल्लक नाही. अशा प्रकारची अफवा पसरवली गेली. २००६ मध्ये ज्या प्रमाणे अफवा पसरवली गेली होती. त्या प्रमाणे २००९ साली ही अशाच प्रकारची अफवा पसरवली गेली. परंतु या प्रत्येक आपत्तीला आम्ही इष्टापत्ती समजत होतो. २००६ व २००९ ला आम्ही सर्व संचालकांनी ठरवले की, ठेवी कमी झाल्या तरी चालतील, पण ठेवीदार ठेव न घेता तो परत नाही गेला पाहिजे. सर्व संचालकांनी त्यांचे दाग – दागिने, स्थावर मालमत्तांचे उतारे माझ्याकडे आणून दिले. त्यांनी सांगितले की, यावर पाहिजे तेवढे कर्ज काढा. पण ठेवीदार परत जाता कामा नये. त्या वेळी ठेवीदारांच्या ठेवी आम्ही परत केल्यामुळे ठेवीदारांचा विश्वास दिवसेंदिवस द्विगुणीत होत गेला. आता आम्ही १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार करणार आहोत.

त्यानंतर ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये शासनाने नोटबंदी जाहीर केली. त्याचेही अनेक परिणाम झाले. २०२० साली कोरोना आला. लॉकडाऊन झाले, त्याचाही फटका आम्हाला बसला. परंतु त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ् आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करताना. संस्थेच्या कोणत्याही ग्राहकाला संस्थेत यावे लागू नये, म्हणून त्याला घरपोहोच सेवा दिली. प्रत्येक आपत्तीला आम्ही इष्टापत्ती समजून सामोरे गेल्यानेच समता ची ही वाढ महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला दिलेल्या मानसिक आणि सर्वं प्रकारच्या आधारानेच अनेक जीवघेण्या संकटातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो आहोत.

समता पतसंस्था आणि महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था संस्थाच नव्हे तर प्रगत बॅंकेत निश्चित फरक आहे. समता पतससंस्था इतर बँकांपेक्षा कोठेही कमी नाही. हे आम्ही आमच्या ग्राहकांना दाखवून दिलेले आहे. समता पतसंस्थाच नाही, तर राज्यातील सर्व सहकारी पतसंस्था चांगले काम करू शकतात. हे आम्ही ग्राहकांना दाखवत असतो. मी महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष असल्यामुळे माझ्या संस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित कामकाज प्रणाली यशस्वी वापरातून समताची कामकाजपध्दती समजावून सांगताना कायम वेगवेगळ्या स्वरूपात वेगळेपण काय आहे? हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरातून दाखवून देत असल्याने समता सहकारी पतसंस्था केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील विविध शहरांतील सहकारी पतसंस्था आणि बॅ़कांसाठी सहकारी आर्थिक क्षेत्रात समता सहकारी पतसंस्था एक तिर्थक्षेत्र बनले याचा समता परिवारास सार्थ अभिमान आहे एवढेच नव्हे तर मी आशिया सहकारी पतसंस्था युनियन (ॲक्यु) चाविक्रमी मताने निवडून आलेला खजिनदार आहे .त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो राष्ट्रीय, खाजगी बँकांमध्ये पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर समता पतसंस्थेत यशस्वी पणाने वापरण्यासाठी व्हाउचरलेस बँकिंग कार्यप्रणाली कार्यरत केली आहे. एखाद्या पतसंस्थेत किंवा बँकेत ठेवीदार ठेवी विड्रॉल करायला आल्यानंतर त्याला क्लार्क कडे जावे लागते. रांगेत उभे राहून क्लार्क ला विड्रॉल स्लिप भरून द्यावी लागते. ती विड्रॉल स्लिप क्लार्क तपासून बघतो. त्या नंतर ती विड्रॉल स्लिप पासिंग ऑफिसरकडे जाते.तेथील सह्याकरिता प्रतिक्षा करीत असल़ेल्या ढिगात जाते पासिंग ऑफिसर ने पास केल्यानंतर ती स्लिप घेऊन तो ग्राहक कॅशियरकडील रांगेत उभे राहिल्यावर काही वेळानंतर. ग्राहकाला अपेक्षित रक्कम मिळते यासाठी अर्धा ते वेळप्रसंगी दोन तासही लागतात.

समता पतसंस्थेत तसे नाही. समताचा ग्राहक पायरी चढत असताना त्याने त्याला दिलेल्या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा मिस्ड कॉल दिल्यानंतर ग्राहकाला त्याच्या नंबर वर एक ओटीपी येईल. त्यानंतर आम्ही सेल्फ बँकिंग डेस्क तयार केलेला आहे. तिथे जाऊन त्याला हवी असलेली रक्कम टाकायची. त्यानंतर एक छोटी पावती त्याला मिळते. ती पावती घेऊन कॅशियरकडे जायचे आणि त्या ग्राहकाला हवे असलेले पैसे त्याने काढायचे. ही सुविधा अवघ्या १०मिनिटात मिळते इतर बँकांमध्ये ही सुविधा पाहायला मिळणार नाही. कारण देशात प्रथमच समताने हा उपक्रम राबविला आहे. याचबरोबर आमच्या पतसंस्थेत जवळपास १०० टक्के पेपरलेस सेवा यशस्वी देखील झालेली आहे. त्याचप्रमाणे सेल्फ बँकिंग प्रणाली सुद्धा समताच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग आरटीजीएस, एनइएफटी सुविधा, क्यू आर कोड अशा प्रकारच्या सुविधा वापरत असल्यामुळे आमचा ग्राहक घरात बसून सुद्धा आमच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो. अशा प्रकारच एक जागतिक पातळीवरील बँकिंग कार्यप्रणाली आम्ही सुरू करण्यात आमचा कोणीच हात धरु शकत नाही.

या व्यतिरिक्त फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम ही संकल्पना राज्यभर फिरत असताना अनेक पतसंस्था अडचणी येताना दिसतात. त्या पतसंस्था फ्रॉड झाल्यामुळे अडचणीत येतात हे माझ्या लक्षात आले. ते फ्रॉड कुठे होतात ? अशी १२ ठिकाणे शोधून काढली आणि समताच्या फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूमच्या माध्यमातून फ्रॉडवर कंट्रोल करण्याचा आमचा प्रयत्न १०० टक्के यशस्वी झालेला आहे. त्या प्रमाणे बँकांची एटीएम अनेक ठिकाणी पाहतो.परंतु समताने मिनी एटीएमची संकल्पना विकसित केलेली आहे. ते मिनी एटीएम घेऊषंम कर्मचारी त्या ग्राहकाच्या घरी जाऊन त्यांना पैसे देतो. विशेषतः जे पेन्शनर आहे. त्यांच्या घरी जातो आणि त्या पेन्शनरांची जगातील कोणत्याही बँकेत जमा असलेली रक्कम समताच्या माध्यमातून त्याला रोख स्वरूपात घरी देण्याचा उपक्रम समताने सुरू केलेला आहे. अशा प्रकारचे वेगळेपण आम्ही समतात निश्चितपणे जपलेले आहे.याच कर्तबगारीचे बळावर समता पतसंस्था देश पातळीवर अव्वल ठरली असल्याचा ठाम आत्मविश्वास व्यक्त करतांना आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पदाधिकारी ग्राहक यांनी समता सहकारी पतसंस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन समता सहकारी पतसंस्थेची कामकाज प्रणाली समजावून घेतांना समता पतसंस्थेला नवीन तंत्रज्ञान माहिती पुरवून समताच्या यशस्वी घोडदौडीत आपला सहभाग नोंदवावाअसे समता सहकारी पतसंस्था अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी कळकळीचे आवाहन करताना सर्व नागरीकांना दिपावली २०२४ निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या निवेदन समारोपात दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे