Breaking
ब्रेकिंग

कमकुवत दिशाहीन, वैफल्यग्रस्त विरोधक असलेल्या जगातील सर्वात मोठया लोकशाहीवरील प्रसार माध्यमांच्या अंकुशाला पर्याय नाही :- झी 24तास न्यूज माजी मुख्य संपादक उदय निरगुडकर

0 0 1 9 4 9

कमकुवत दिशाहीन, वैफल्यग्रस्त विरोधक असलेल्या जगातील सर्वात मोठया लोकशाहीवरील प्रसार माध्यमांच्या अंकुशाला पर्याय नाही :- झी 24तास न्यूज माजी मुख्य संपादक उदय निरगुडकर

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगांव —
साठ वर्षे भारत देश जगातून 98 % विविध स्वरूपात आयात करीत होता परंतु आज विविध उत्पादनांची 98% निर्यात करीत आहे . कोरोना काळातील संकटातून सावरत जगातील सर्वात जास्त तरुण युवा क्रय शक्तीची विक्रमी विकसित बाजार पेठ बनलेला देश व जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जातअसतांना देशात विरोधी पक्ष शक्तीहीन, विस्कळीत,वैफल्यग्रस्त ,निष्क्रिय बनला आहे यामुळे देशातील विकासवृध्दी व राजकीय सामाजिक सांस्कृतिक शाससकिय कामकाज भरकटले जावू नये यासाठी विश्वासार्ह , संवेदनशील, कठोर , निर्भय, जागृत प्रसारमाध्यमांचाअंकुश देशावर ठेवण्याशिवाय अन्य पर्यायच नसल्याचा ठाम विश्वास जेष्ठ राजकीय विश्लेषक व झी 24 तास न्यूज चॅनलचे माजी मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला.

पत्रकार दिनानिमित्त कोपरगाव व पंचक्रोशीतील विविध पत्रकार बांधवांचा सन्मान संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या वतीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. उदयजी निरगुडकर यांच्या अभ्यासू मार्गदर्शनाने पार पडला. याप्रसंगी सभागृह मंत्रमुग्ध झाल्याची अनुभूती आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी भुषविले.


या प्रसंगी बोलताना डॉ. निरगुडकर म्हणाले आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू करून प्रतिकूल काळात व्यवस्थेला न्यायाचा आरसा दाखवण्याचे काम केले.
आपला भारत देश आज स्वयंपूर्ण होतो आहे.तत्वशिल पत्रकारिता हा पिंड जपला जाण्यासाठी ठाम राहणे गरजेचे आहे.सत्याच्या शोधासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी आपण ठेवली तर येणारा काळ हा अमृत काळ असणार आहे.
जगाच्या स्पर्धेत आपल्या देशासाठी आगामी २५-३० वर्षे अतिशय महत्वाची असून सर्वाधिक तरुण असणारा देश म्हणून आपण विकासाची घोडदौड करतो आहे त्यामुळे कोण काय म्हणेल त्या पेक्षा प्रसार माध्यमातून सतत कार्यरत असणे महत्वाचे ठरणार आहे.कोण काय बोलतात त्या पेक्षा आपण तत्वांशी तडजोड न करता घेतलेली भूमिका ही यशापासून रोखू शकत नाही.स्पर्धेच्या युगात बातमीचा दर्जा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे
आज धंदेवाईक पत्रकारितेत जाहिरात आणि बातम्या यांच्या मधील जिवघेण्या संघर्षात प्रेक्षक व वाचक यांच्या गरजेचे , विश्वासार्ह देण्यासाठी प्रसार माध्यमे कमी पडत आहे . यामुळे 18 ते 30 रुपये खर्चून तयार केलेले दिलखेचक वर्तमानपत्र पाच रुपयांत घेतांना नाखुश वाचक आपला हात आखडता घेतो. तर लाखो रुपये खर्चून जीवाचे रान करून तयार केलेल्या सनसनाटी बातम्यांचा टीआरपी दिवसेंदिवस विक्रमी स्वरूपात घसरतो आहे.

 

अशा भिषण परिस्थितीत देशाला वाचविण्यासाठी पत्रकारांनी सर्वं सामान्य प्रेक्षक व वाचकांच्या सहकार्यासाठी त्यांच्या आवडी आणि गरजेनुसार विश्वासार्ह, कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही स्वरूपात तडजोड न करता बातम्या देण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नाही याकरिता 24 तास जागरूक संवेदनशील कठोर निर्भयतेने कायम विविध प्रकारचे वाचनातून,सतत प्रत्यक्ष स्थळीं जावून सर्वं सामान्य जनतेला लाभ आणि न्याय देणाऱ्या बातम्या माहिती देण्यात सतत आघाडी वर राहिला तरच याप्रबोधनातून प्रेक्षक व वाचक तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्यानंतर तुम्हाला प्रसार माध्यमे, वि्कास आणि राजकीय सामाजिक आर्थिक शासकीय कामकाजात हुकूमत गाजवता येईल असा ठाम विश्वास निरगुडकर यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी भाजपा नेत्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा उपस्थितांना देतांना निरपेक्ष पत्रकार हे राष्ट्र घडविण्यासाठी मोलाची भूमिका
बजावतात.पत्रकारिता ही लोकशाहीचा कणा असून देशाच्या सर्वांगीण विकासाचे चित्र त्यामुळे निर्माण होणे सहज शक्य आहे .
माजी मंत्री व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी काही काळ जोपासले . असून तोच वारसा आम्हीं जपत असल्याचे सांगितले
या प्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालकव सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे अंबादास अंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम सूत्रसंचालन साहेबराव दवंगे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे