रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल “बेस्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजिट” पुरस्काराने सन्मानीत
संपादक - अरुण आहेर
रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल “बेस्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजिट” पुरस्काराने सन्मानीत
🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगाव : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ आयोजित परिवर्तन अवॉर्ड २०२३/२४ चे पाचगणी जि.सातारा येथे नुकतेच पारितोषिक वितरण करण्यात आले.
पाचगणी येथे झालेल्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल ला हा मानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वाती हेरकळ व पी.डी. जी. रो.रवींद्र साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान करतानाही सर्व मान्यवरांनी क्लबचे प्रचंड कौतुक केले. क्लबचे अध्यक्ष रो. राकेश काले, सेक्रेटरी रो.विशाल आढाव, माजी अध्यक्ष रो. वीरेश अग्रवाल आणि इतर सदस्यांनी पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी असिस्टंट स्टेट गव्हर्नर दीपक मनियार, वर्ष २०२४-२५ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेश साबू उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ११ जिल्हे आणि ९४ रोटरी क्लबमधून बेस्ट डीजी विजिटचा पुरस्कार क्लब ने जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
डीजी विजिट ही क्लबचे कामकाज रोटरीच्या सर्व नियमानुसार चालले आहे, हे तपासण्यासाठी करण्यात येते स्वतः डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यावेळी क्लबला भेट देत असतात आणि त्याच विजिट चे सर्वोत्कृष्ट नियोजन केल्याने रोटरी कोपरगाव सेंट्रल क्लबला हा पुरस्कार प्राप्त झाला.
विशेष बाब म्हणजे हा पुरस्कार स्वीकारण्याकरिता जात असताना क्लब च्या सदस्यांनी पाचगणी येथे पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा संदेश दिला.
या पुरस्काराबद्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्टी रोटरी क्लब चे मार्गदर्शक मा. श्री. अमित कोल्हे आणि संजीवनी चे ट्रस्टी मा. श्री. सुमितद कोल्हे तसेच इतर मान्यवरांनी क्लबचे अभिनंदन केले आहे.