Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते विधीवत पुजन संपन्न.

संपादक - अरुण आहेर

0 0 5 3 9 7

🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगांव :-.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४.२५ गळीत हंगामातील मिल रोलरचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते विधीवत पुजन मंगळवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडले.

प्रारंभी कार्यकारी संचालक श्री. बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करतांना सांगितले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सन २०२४.२५ चा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व नियोजन पुर्ण केले असुन त्यादृष्टीने काम सुरू आहे., कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन यावर्षीचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यावर व्यवस्थापनाचा भर आहे. कार्मिक अधिकारी व्ही. एम. भिसे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

श्री. विवेक कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची प्रेरणा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात आपण प्रभावीपणे कामकाज करण्यासाठी सज्ज आहोत.आगामी काळात जोमाने अधिकाधिक गाळप होण्याचे लक्ष आपण ठेवले आहे.रोलर पूजन करुन येणाऱ्या हंगामासाठी कोल्हे कारखाना पूर्णपणे सज्ज आहे.

या प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री. त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, विश्वासराव महाले, विलासराव वाबळे, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, ज्ञानदेव औताडे, अप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, निवृत्ती बनकर, संजय औताडे, विलासराव माळी, बापूसाहेब बाराहाते, डी. पी मोरे, अमोल गवळी, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणूनाथ बोळीज यांच्यासह सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 3 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे