Breaking
ब्रेकिंग

सभासदांचे हित साधून प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान करा-आ.आशुतोष काळे

0 0 5 5 8 3

         सभासदांचे हित साधून प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान करा-आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सेवकांच्या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या प्रगतीमध्ये संस्थेच्या सभासदांचा मोठा आणि मोलाचा वाटा आहे. संस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी यंत्रणा नसून तिच्याशी जोडलेल्या प्रत्येक सभासदांच्या कष्टातून तिची खरी ताकद निर्माण होत असते.संस्थेच्या प्रगतीसाठी कारखान्याच्या माध्यमातून आवश्यक असणारे सर्वोतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यामुळे सभासदांचे हित, सभासदांचा विश्वास आणि संस्थेची आर्थिक शिस्त यांचा समन्वय साधत पतपेढीची प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान करावी असा मौलिक सल्ला आ.आशुतोष काळे यांनी दिला.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतपेढी या संस्थेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे चेअरमन प्रमोद आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात पार पडली.याप्रसंगी उपस्थित संचालक मंडळाला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षपदाची सुचना राहुल थोरात यांनी मांडली. या सूचनेस कृष्णा भोसले यांनी अनुमोदन दिले.श्रद्धांजली ठरावाचे वाचन संचालक संदीप आढाव यांनी केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद आभाळे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संस्था प्रगतीपथावर आहे. कारखान्याच्या कामगार सभासदांना वैयक्तिक कर्ज पुरवठा,आवश्यक सोयी सुविधा पुरवित आहे. संस्थेला सर्व प्रकारच्या मिळालेल्या उत्पन्नातून संस्थेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण २६ लाख ७१ हजार रुपयांचा नफा झाला असून ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.सालाबादप्रमाणे याहीवर्षी सभासदांना १०% लाभांश देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.बदलत्या काळानुसार संस्थेच्या कारभारात अधिकची पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जास्त ठेव ठेवणाऱ्या व जास्तीत जास्त लाभांश घेणाऱ्या सभासदांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अहवाल वाचन मॅनेजर कुलदीप गांगुर्डे यांनी केले. सभेपुढे मांडण्यात आलेले १ ते १२ विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिनार कुदळे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, सेक्रेटरी बाबा सय्यद, कामगार सेक्रेटरी नितीन गुरसळ आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हा.चेअरमन वैभव काळे यांनी केले तर आभार संचालक संजय पोथारे यांनी मानले.

           

 

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 5 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे