संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ११ अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड
संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ११ अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क कोपरगांव :—- स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या पहिल्या बॅचची दमदार सुरूवात
कोपरगांवः संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने २०२०-२१ मध्ये स्वायत्त संस्थेच्या दर्जाचा फायदा घेत स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही पूल, उड्डाणपूल, धरणे, इमारती, स्टेडियम आणि बोगदे तसेच ऑफशोअर , इत्यादींचे वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी नवीन शाखा सुरू केली. या शाखेची पहिली बॅच सध्या अंतिम वर्षात आहे.
संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने एचएनबी इंजिनिअरींग प्रा. लि. कंपनीने ५ तर चॅक युनायटेड टेक्नाॅलाॅजिज प्रा. लि.ने ६ नवोदित अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकऱ्यांसाठी निवड झाली असल्याची माहिती संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.
सांडपाणी प्रक्रिया नियोजन, डीझाईन, बांधकाम आणि देखभाल सेवेतील आघाडीच्या एचएनबी इंजिनिअरींग प्रा. लि. कंपनीने अनंत रामनाथ मडके, दिनेश मोतीलाल पंडुरे, किरण बाबासाहेब कळसकर, वैभव रविंद्र कापसे व स्वप्निल प्रकाश डोबोळे यांची निवड केली तर विविध प्रकारच्या स्टील स्ट्रक्चरचे डीझाईन करून ते पुरविण्याच्या आघाडीच्या चॅक युनायटेड टेक्नाॅलाॅजिज प्रा. लि. कंपनीने साक्षी संतोष सोनवणे, स्नेहल बाबासाहेब वाघसकर, कोमल शिवाजी लांडगे, ऋषिकेश संजय कासार, प्रतिक्षा साहेबराव त्रिभुवन व साक्षी अनिल देशमुख यांची निवड केली आहे. अशा प्रकारे स्ट्रक्चरल इंजिनिअरींगच्या पहिल्या बॅचच्या नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी दमदार सुरूवात झाली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व नवोदित अभियंत्यांचे, डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. ए. एस. सय्यद, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. विशाल तिडके यांचे अभिनंदन केले आहे.