जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील प्रलंबित विकासात्मक कामासंदर्भात बैठक संपन्न
संपादक - अरुण आहेर

जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील प्रलंबित विकासात्मक कामासंदर्भात बैठक संपन्न
कोपरगाव – विधानसभा मतदारसंघातील विविध प्रकारच्या विकासत्मक प्रलंबित कामांचे नियोजन जलसंपदामंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे पा. साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाची बैठक पार पडली.
ह्या बैठकीत कोपरगाव मतदारसंघातील प्रस्तावित असलेल्या पाणीपुरवठा योजनांना कालव्यावर आरक्षण मिळावे…
– गोदावरी कालवे नूतनीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी दोन्ही कालव्यांचे क्षेत्रीय उपविभागीय कार्यालय नाशिक येथून अहिल्या नगर जिल्ह्यात हलवावे,
– नांदूर मधमेश्वर जलद कालव्याची देखभाल व दुरुस्ती करावी,
– विशेष बाब म्हणून कोपरगाव मतदारसंघातील चासनळी, जेऊर कुंभारी व मायगाव देवी येथे प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनांना गोदावरी कालव्यांवर आरक्षण द्यावे,
– कोपरगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा तलाव क्र. 4 व 5 साठी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून मुख्य विमोचक बांधून मिळावे,
– गोदावरी डाव्या तट कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांसाठी खरीप हंगामात ओव्हरफ्लोच्या काळात उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्यात यावी.
– दारणा प्रकल्पाअंतर्गत गोदावरी डावा तट कालवा व वितरण प्रणालीचा सुधारणा करणे कामाच्या प्रथम टप्प्यात समावेश करण्यात यावा.
– नांदूर मधमेश्वर जलद कालव्याअंतर्गत वितरिका क्र. 1 व 2 चे नूतनीकरण व काँक्रिट अस्तरीकरण करण्यात यावे.
– गोदावरी नदीवरील केटीवेअर मधून उपसा सिंचनासाठी परवानगी मिळावी,
– गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती ही साखर कारखान्यांमार्फत केली जात असुन सन 2006 ते 2012 व सन 2021 ते 2024 ह्या कालावधीतील कारखान्यांचे देय बिलाच्या रकमेचे समायोजन पाणी पट्टीमध्ये जमा करण्यात यावे.
– कोपरगाव शहरातील पाटबंधारे विभागाची सर्वे नं. 1630 मधील जागा रयत शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाला देण्यात यावी,
– तसेच सर्वे नं. 237 मधील जागा व्यापारी संकुल व उद्यानासाठी नगरपरीषदेकडे वर्ग करण्यात यावी.
आदी मागण्या आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांनी केल्या असुन मा. मंत्री महोदयांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. दिपक कपूर , सचिव संजय बेलसरे, गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता . तीनमवार ,मुख्य अभियंता विजय घोगरे, जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्रचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ , मंत्रालय जलसंपदा विभागाचे सह सचिव तथा मुख्य अभियंता संजीव टाटू आदी उपस्थित होते.